शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अमली पदार्थांची विक्री खुलेआम

By admin | Updated: July 2, 2015 01:14 IST

पोलिसांसाठी डोकेदुखी : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह उच्चभ्रू व्यक्तींकडून मागणी

एकनाथ पाटील -कोल्हापूर -‘मेफेड्रोन’(ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची खुलीसह आॅनलाईन विक्री शहरासह उपनगरांत खुलेआम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील उच्चभ्रू वर्गातील काही व्यक्तींकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची आॅनलाईन मागणी होत आहे. हे आॅनलाईन रॅकेट मात्र पोलिसांची डोकेदुखी बनत आहे. राज्यात अमली पदार्थ विक्रीसाठी शासनाने बंदी घातली आहे; परंतु छुप्या मार्गाने आजही या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात हायफाय अमली पदार्थांची मागणी वाढत असल्याचे भयावह चित्र आहे. अफू, चरस, गांजा, भांग यांसारख्या पारंपरिक अमली पदार्थांची चलती आहे. शहरातील उच्चभ्रू वर्गातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून अशा अमली पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यांच्याकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी केली जात आहे. या अमली पदार्थांची देवघेव करण्यासाठी रॅकेट आहेत. ती अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून ग्राहकांपर्यंत पुरवठा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे व्यवहार सांकेतिक भाषेत चालतात. त्यांच्याकडून प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट सांकेतिक शब्द (कोड) तयार करण्यात आला आहे. या अमली पदार्थांची गुजरात, जम्मू-काश्मीरमधून देशभरात तस्करी केली जात असल्याचे समजते. काही अमली पदार्थांचा हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जात असल्याचे समजते. तरुणांचा गुन्हेगारीकडे प्रवास फेब्रुवारी २०१५ मध्ये इस्लामपूर येथे एका खासगी बसमध्ये ‘मेफेड्रोन’(ड्रग्ज)चा साठा पोलिसांना मिळून आला होता. या कारवाईवरून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मेफेड्रोन ड्रग्ज हा साखरेसारखा पांढरा पदार्थ असून त्याला कोणत्याही प्रकारची चव नाही. त्याचे चहा, कॉफी, थंड पेये, आदींद्वारे सेवन करता येते. त्याचा नशेचा कालावधी दीर्घ असल्याने तरुण पिढी या अमली पदार्थांकडे जास्त आकर्षित व प्रभावित होत आहे. त्याची किंमतही जास्त असल्याने तो खरेदी करण्यासाठी वेळप्रसंगी तरुण पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. अशी होते विक्री अमली पदार्थांची मागणी करताना ती मोबाईल एसएमएस, वॉट्स अ‍ॅप व ई-मेलद्वारे विशिष्ट कोडद्वारे केली जाते. त्यानंतर तो पदार्थ एजंटाद्वारे थेट गिऱ्हाइकापर्यंत पोहोचविला जातो. त्यापूर्वी संबंधित गिऱ्हाइकाची पूर्णत: खात्री केली जाते. दहा वर्षांची शिक्षा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई झाल्यानंतर त्यांना या प्रकरणात कमीत कमी दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. अमली पदार्थांचा साठा किंवा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. अमली पदार्थांची विक्री कोठे होत असल्यास त्याची माहिती ०२३१-२६६५६१७ या फोन क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- दिनकर मोहिते; पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग