ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 04:27 PM2020-02-21T16:27:26+5:302020-02-21T16:29:42+5:30

प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Online food delivery companies face a flurry of commissioners | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका

Next
ठळक मुद्देप्लॅस्टिकच्या पिशवीतून खाद्यपदार्थांचा पुरवठा दोन कंपन्यांना पाच हजारांचा दंड

कोल्हापूर : प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनीमार्फत प्लास्टिक पिशवीमधून खाद्यपदार्थ दिले जातात, अशी तक्रार आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आली होती. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना खात्री करुन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ. विजय पाटील यांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाला ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास सांगितले.

संबंधित कंपनीकडून ही आॅर्डर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आल्यावर पथकाने खाद्यपदार्र्थांची आॅर्डर तपासली असता ते खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीमधून आणल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आणि दंडाची पावती संबंधितांना देण्यात आली.

याशिवाय ज्या हॉटेलमधून हे खाद्यपदार्थ मागविण्यात आले होते, त्या कोल्हापूर डायनिंग हॉटेललाही पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाई वेळी विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर आरोग्य निरीक्षक सुशांत शेवाळे, सुशांत कावडे, मनोज लोट व श्रीराज होळकर उपस्थित होते.

Web Title: Online food delivery companies face a flurry of commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.