बाजारात कांद्याची उसळी, घाऊक बाजारात ५१ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 11:14 AM2020-10-13T11:14:27+5:302020-10-13T11:19:04+5:30

kolhapurnews, market, krushiutpannbajarsamiti, onian, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याने चांगलीच उसळी घेतली. कांद्याची आवक कमी असल्याने प्रतिकिलो ५१ रुपये दर झाला. सरासरी दरही ३५ रुपयांच्या पुढे आहे.

Onion surges in the market, Rs 51 per kg in the wholesale market: the highest fortnightly rate | बाजारात कांद्याची उसळी, घाऊक बाजारात ५१ रुपये किलो

बाजारात कांद्याची उसळी, घाऊक बाजारात ५१ रुपये किलो

Next
ठळक मुद्देबाजारात कांद्याची उसळी, घाऊक बाजारात ५१ रुपये किलो पंधरा दिवसांतील उच्चांकी दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याने चांगलीच उसळी घेतली. कांद्याची आवक कमी असल्याने प्रतिकिलो ५१ रुपये दर झाला. सरासरी दरही ३५ रुपयांच्या पुढे आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना होती. मध्यंतरी काही प्रमाणात मार्केटवर परिणामही झाला. सप्टेंबरच्या शेवटचा आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली. घाऊक बाजारात १० रुपयांपासून दर होता. कमाल दर ३५ रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत होता.

गेले आठ दिवस कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होती. सरासरी ४५०० पिशव्यांची आवक व्हायची. सोमवारी मात्र आवक ३५०८ पिशव्यांवर आली. त्यामुळे दरात काहीशी तेजी आली. किमान दर १५, तर कमाल दर ५१ रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. सरासरी दरही ३५ रुपये राहिला.

बटाटा मात्र स्थिर

बटाट्याची आवक गेले महिनाभर स्थिर आहे. त्यामुळे दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरासरी दर २८ रुपये किलोपर्यंतच राहिला आहे.

बाजार समितीतील कांद्याचा दरदाम असा प्रतिकिलो-

तारीख                 आवक   पिशवी किमान      कमाल


५ ऑक्टोबर               ५५८७               १०            ३५
६ ऑक्टोबर               ४२६९               १०            ३५
७ ऑक्टोबर               ५१६५               १०           ३५
८ ऑक्टोबर               ४४५८               १२           ३६
९ ऑक्टोबर              ४२८०               १०           ३७
१० ऑक्टोबर            ४८६५               १०           ३८
१२ ऑक्टोबर            ३५०८              १५             ५१
 

Web Title: Onion surges in the market, Rs 51 per kg in the wholesale market: the highest fortnightly rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.