तांबाळेनजीक अपघातात शिवडावच्या एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:39+5:302020-12-15T04:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : तांबाळे-शिवडाव राज्यमार्गावर मोटारसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात शिवडाव येथील शिवाजी राजाराम तोरस्कर ...

तांबाळेनजीक अपघातात शिवडावच्या एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : तांबाळे-शिवडाव राज्यमार्गावर मोटारसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात शिवडाव येथील शिवाजी राजाराम तोरस्कर (वय ३८) यांचा मृत्यू झाला तर मुलगा राकेश हा जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद नरेश तोरस्कर यांनी पोलिसांत दिली
अधिक माहिती अशी, पाटगाव येथून उसाने भरलेला ट्रक (एमएच ०४ पी. ७७६४) हा तांबाळे कारखान्याकडे जात होता. तांबाळे येथील आज रविवारी आठवडी बाजार असल्यामुळे शिवाजी तोरस्कर व त्याचा मुलगा राकेश (१४) हे दुचाकीवरून (एमएच-०९ एफके १५९१) शिवडावला परत जात होते. यावेळी कारखाना फाट्यानजीक उसाने भरलेला ट्रक व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची खडी सर्वत्र विखुरलेली आहे. ट्रक चुकीच्या बाजूने जात असताना खडीवरून मोटारसायकल घसरून पाठीमागील चाकात सापडली. त्यात शिवाजी तोरस्कर गंभीर जखमी होत त्याचा मृत्यू झाला. मुलगा राकेश हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी ट्रकचालक सतीश सदाशिव देसाई (रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फोटो उपलब्ध नाही