शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जमीन कसते तिसरी पिढी.. सातबारा आजोबांच्या नावे; नोंदणी शुल्क माफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार

By भीमगोंड देसाई | Updated: May 29, 2025 19:16 IST

शेत वाटणीची एक टक्का दस्त नोंदणी शुल्क वाचणार

भिमगोंड देसाईकोल्हापूर : शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. यामुळे दुय्यम निबंधकांकडे वाटणीच्या नोंदणीसाठी मूल्यांकनाचा एक टक्का शेतकऱ्यांचा वाचणार आहे. मात्र यापेक्षा सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया महसूल प्रशासनाकडे यापूर्वीच मोफत आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन निर्णयाचा फायदा केवळ दुय्यम निबंधकांकडे वाटणीपत्र नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. हे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे, असे मुद्रांक प्रशासनाचे म्हणणे आहे.रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहिणी संमतीने शेतजमीन वाटणी करून घेतात. त्याची नोंदणी दुय्यम निबंधकांकडे गेली तर त्या जमिनीच्या रेडीरेकनर मूल्यांकनाच्या एक टक्का रक्कम किंवा अधिकाधिक ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावी लागत होती. आता शासनाने नोंदणी शुल्क माफ केल्याने ही रक्कम भरावी लागणार नाही.पण यापेक्षा शेतकरी पूर्वीपासूनच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदार यांच्यासमोर मोफत वाटणीपत्राची तरतूद आहे. ही प्रक्रिया दुय्यम निबंधकांपेक्षा सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे सर्व भाऊ, बहीण यांची संमती असेल तर तहसीलदार यांच्यासमोरच वाटणीपत्र करून घेतो. वाद असल्यास न्यायालयात वाटणीपत्र दाखल होते. तेथे लागलेल्या निकालपत्रानुसार किंवा तडजोड नामानुसार मालमत्तेची वाटणी होते.

शेतकऱ्यांसाठी निर्णय चांगला मात्र लाभ कमीभाऊ, बहिणीमध्ये संमतीने वाटणीपत्र करून त्याची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करणाऱ्यांसाठी नवीन निर्णय चांगला आहे. पण अशा पद्धतीने नोंदणी करण्याकडे कल कमी असल्याने याचा लाभ कमी शेतकऱ्यांना होणार आहे, असे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.

दलालांमधून सुटका कधी ?दुय्यम निबंधकांकडील शुल्क माफ झाले आहे. पण येथे नोंदणीसाठी सक्रिय असलेल्या दलालांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची कधी सुटका होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीGovernmentसरकार