आजरा आंबोली रस्त्यावरील अपघातात हाळोलीचा एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2024 21:05 IST2024-01-03T21:00:37+5:302024-01-03T21:05:04+5:30
मोटरसायकलचा इको गाडीला धक्का लागून क्लुजर गाडीला जोराची धडक दिली.

आजरा आंबोली रस्त्यावरील अपघातात हाळोलीचा एक ठार
- सदाशिव मोरे
आजरा : आजरा आंबोली रस्त्यावर क्लुजनर गाडीला दिलेल्या जोराच्या धडकेत हाळोली (ता. आजरा) येथील मोटरसायकलस्वार दत्तात्रय बाळू गोवेकर ( वय ४३ ) हा जागीच ठार झाला आहे. तो गवंडी काम करीत होता. आजऱ्याहून तो हाळोलीला जात होता. तर एमआयडीसी येथील काजू फॅक्टरीतून महिलांना घेऊन क्लुजनर गाडी साळगाव येथे जात होती. या गाडीला पाठीमागून येणारी इको गाडी ओव्हरटेक करीत होती.
मोटरसायकलचा इको गाडीला धक्का लागून क्लुजर गाडीला जोराची धडक दिली. त्यानंतर रस्त्यावर दत्तात्रय गोवेकर जोराने आपटल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या डोकीला हेल्मेट नसल्यामुळे घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. तर मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी, एक मुलगा आहे.