शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:48 IST

मुलीला उच्चशिक्षित बनविण्याचे वडिलांचे स्वप्न भंगले

भोगावती : कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कुरूकली (ता. करवीर) येथे बसस्थानकावर एस.टी.ची वाट पाहत उभा असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव कार (एमएच ०९ बीबी ५९०७) घुसली. यामध्ये प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८), अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे) आणि श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे) या कारखाली सापडल्या. प्रज्ञाला कारने जवळपास शंभर मीटर फरफटत नेले. या घटनेत ती ठार झाली असून, अन्य तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. चालक राशिवडे बुद्रुक येथील असून अल्पवयीन आहे. त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी अस्मिता अशोक पाटील हिने याबाबतची फिर्याद दिली. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थिनी आपापल्या गावी जाण्यासाठी कॉलेजपासून अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या कुरुकली एस.टी. बसथांब्यावर एकत्र थांबलेल्या होत्या. यावेळी कोल्हापूरकडून राधानगरीकडे भरधाव निघालेली कार मुलींच्या घोळक्यात घुसली. यामध्ये चौघीजणी गंभीर जखमी झाल्या.त्यांना तातडीने १०८ ॲम्ब्युलन्समधून सीपीआर रुग्णालयात नेले. तेथे यांपैकी प्रज्ञा कांबळे हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले नंतर या तिघींना पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रज्ञाच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.जखमी अस्मिताची घरची परिस्थिती बेताचीगंभीर जखमी झालेल्या अस्मिता पाटील या विद्यार्थिनीची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई रोजंदारी करत तीन मुलींचे शिक्षण पूर्ण करत आहे. अस्मिताच्या अपघाताने ती हतबल झाली आहे. आता अस्मिताच्या औषधपाण्याचा खर्चदेखील पेलवणार नाही, अशी परिस्थिती आहे.प्रज्ञा वडिलांची लाडकी मृत प्रज्ञा कांबळे ही वडिलांची अतिशय लाडकी होती. मुलीच्या शिक्षणासाठी वाटेल ते काम करून तिला उच्चशिक्षित बनवण्याचे त्यांचे स्वप्न या घटनेने भंगले.