मोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:00 IST2019-07-11T16:58:12+5:302019-07-11T17:00:49+5:30
रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट घोड्याने जोरात धडक मारल्याने एकजण जखमी होण्याचा प्रकार कोथळी रोडवर (ता. करवीर) के. बी. पाटील सहकारी संस्थेसमोर घडला. यामध्ये रंगराव पांडुरंग पाटील (वय ५५ रा. कोथळी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी घडली.

मोकाट घोड्याच्या धडकेत एकजण जखमी
कोल्हापूर : रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट घोड्याने जोरात धडक मारल्याने एकजण जखमी होण्याचा प्रकार कोथळी रोडवर (ता. करवीर) के. बी. पाटील सहकारी संस्थेसमोर घडला. यामध्ये रंगराव पांडुरंग पाटील (वय ५५ रा. कोथळी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १०) सायंकाळी घडली.
कोथळी (ता. करवीर) येथे रंगराव पाटील हे रस्त्यावर उभे होते. यावेळी फिरणाऱ्या मोकाट घोड्याने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये पाटील हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत गंगावेशमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
याबाबत पाटील यांचा मुलगा पंकज रंगराव पाटील (वय २७) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार घोड्याचे मालक उत्तम राघू येडके (रा. कोथळी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.