मोबाईल चार्ज करताना विजेच्या धक्याने एकाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 16:57 IST2019-09-07T16:56:08+5:302019-09-07T16:57:23+5:30
कळंबा (ता.करवीर) येथील पॉवरग्रीड प्रकल्पाच्या वाहनतळामध्ये मोबाईलची बॅटरी चार्ज करताना शुक्रवारी (दि.७)रात्री विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यु झाला. अतुल राजकुमार शेटे (वय २४, रा. पॉवरग्रीड कॉलनी, कळंबा, मूळ गाव म्हसवड, ता, माण, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाईल चार्ज करताना विजेच्या धक्याने एकाचा मृत्यु
कोल्हापूर : कळंबा (ता.करवीर) येथील पॉवरग्रीड प्रकल्पाच्या वाहनतळामध्ये मोबाईलची बॅटरी चार्ज करताना शुक्रवारी (दि.७)रात्री विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यु झाला. अतुल राजकुमार शेटे (वय २४, रा. पॉवरग्रीड कॉलनी, कळंबा, मूळ गाव म्हसवड, ता, माण, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, अतुल शेटे हे पॉवरग्रीड प्रकल्प येथे नोकरीस होते. ते शुक्रवारी रात्री आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी पॉवरग्रीडच्या वाहनतळ येथे गेले. या ठिकाणी त्यांनी मोबाईल चार्ज करनाता जोरदार विजेचा धक्का बसून ते बेशुध्द झाले.
हे समजताच आसपासच्या लोकांनी त्यांना बेशुध्दावस्थेतच ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचार सूरु असताना त्यांचा मृत्यु झाला. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.