करंट उतरल्याने विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 19:29 IST2021-03-10T19:27:35+5:302021-03-10T19:29:19+5:30
Accident Kolhapur- मौजे वडगांव (ता हातकणंगले) येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी (वय ४१) यांचे पाण्याच्या घरगुती विज मोटरचा शाँक लागुन मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला.

करंट उतरल्याने विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू
हेरले/कोल्हापूर : मौजे वडगांव (ता हातकणंगले) येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी (वय ४१) यांचे पाण्याच्या घरगुती विज मोटरचा शाँक लागुन मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला.
घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, सचिन कुलकर्णी यांच्या घरी आज सकाळी चावीला पाणी आले होते. त्यासाठी त्यांनी विजेची मोटर लावली होती. प्रेशरने पाण्याची पाईप निघाल्याने मोटर चालू असतानाच सचिन पाईप बसवण्यासाठी गेले होते. यावेळी मोटारीमध्ये करंट उतरल्याने ते चिकटुन बसले.
आई, वडीलांनी आरडाओरडा केला पण तोपर्यत सचिन यांचा मृत्यू झाला होता. सचिन वारकरी सांप्रदायात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे परीसरावर शोककळा पसरली आहे.त्याच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.