Kolhapur News: सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत एकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:09 IST2023-03-08T19:08:43+5:302023-03-08T19:09:07+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत बारचालकाने उडी टाकून आत्महत्या केली. अमित जयप्रकाश मोरजकर (वय ४४, रा. ...

Kolhapur News: सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत एकाची आत्महत्या
प्रकाश पाटील
कोपार्डे : सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत बारचालकाने उडी टाकून आत्महत्या केली. अमित जयप्रकाश मोरजकर (वय ४४, रा. पिपळे तर्फ सातवे ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. दुपारी तीन वाजता ही घटना घडली. घटनास्थळी आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा होती. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली.
घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमित मोरजकर हा कोपार्डे येथील डी. एस. बार भाड्याने चालवत होता. तो पत्नी व मुलगा यांच्यासह येथे राहत होता. गेली दोन दिवस अमित हा आर्थिक विवंचनेतून अस्वस्थ होता. सकाळी न सांगता आपल्या दुचाकीवरून तो बाहेर पडला. सांगरुळ बंधाऱ्याजवळ मोठ्या पुलावर येऊन थांबल्याचे ये-जा करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. दुपारी त्याने पुलाच्या कटड्यावरून नदीत उडी टाकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर गोरख मगदूम, अमर घुंगुरकर या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला. खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. घटनास्थळी मित्र, पत्नी आणि मुलगा आला आणि पतीचे आत्महत्या केल्याचे पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.