शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा लिंग चाचणी करताना एकास रंगेहात पकडले; आरोग्य पथक, पोलीस पथकाच्या कारवाईनं भुदरगड तालुक्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 23:06 IST

जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिवाजी सावंत -

गारगोटी : मडिलगे खुर्द ता. भुदरगड येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करताना पोलिसांनी एकाला रंगेहात पकडले आहे. विकास ऊर्फ विजय लक्ष्मण कोळस्कर असे संशयिताचे नाव आहे. जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मडिलगे खुर्द येथे संशयित विजय कोळस्कर हा त्याच्या राहत्या घरी यंत्राद्वारे बेकायदेशीर लिंग तपासणी करीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाला लागली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग चाचणीसाठी महिला पाठवून दिली. त्या महिलेची गर्भलिंग चाचणी करताना त्याला रंगेहात पकडले. त्याच्या घरातील सोनोग्राफी मशीन व गर्भनिरोधक गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. 

जिल्हा आरोग्य पथकातील ॲड गौरी पाटील, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांच्यासह जिल्हा पोलीस पथक व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसात सुरू आहे. लाखोंची उड्डाणे -संशयित हा काही वर्षांपूर्वी कागल  एमआयडीसी मध्ये नोकरीस होता.त्यातून त्याची ओळख बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या लोकांशी झाली.कमिशन एजंट म्हणून काम करता करता अमाप पैसा मिळवून स्वतःचे सोनोग्राफी मशीन घेतले.आणि स्वतः चा गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा गोरख धंदा सुरू केला.या कुकर्मातून लाखो रुपयांची माया जमविली आहे.आज त्याच्याकडे गाडी, बंगला,लाखो रुपयांची शेअर बाजारात गुंतवणूक असल्याची चर्चा सुरू आहे .

नवजात बालकांचे जीव घेऊन लक्षाधीश -   या गोरख धंद्यात अनेकजण गुंतले असून यातून लाखोंची माया जमविली आहे.पण जगात येण्याआधी आईच्या गर्भात नरडीचा घोट घेणाऱ्या या नराधमाना कायद्याने कडक कारवाई होत नाही . गुन्हा दाखल झाल्यावर हे निर्दोष कसे काय सुटतात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला "अर्थपूर्ण" यक्ष प्रश्न आहे.

पैसे कमावण्याच्या हव्यासाने केलेले पाप कोठे फेडतील? -   गर्भलिंग चाचणी करण्यासाठी पंचवीस हजार तर गर्भपात करण्यासाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये असा दर आहे.या राक्षसी मनोवृत्तीने पैसे कमविण्यासाठी गर्भात मुलगा असला तरी मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करायला लावले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHealthआरोग्य