शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधात एकास एक उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:37 IST

गडहिंग्लज : विरोधक एकत्र आले की काय होऊ शकते हे परवाच्या लोकसभा आणि विधानसभांच्या पोटनिवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मोदींचे सरकार पुन्हा येणार नाही, असे भाकीत करतानाच धर्मांध शक्तीविरुद्ध संविधानवाद्यांची मोट बांधून भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा काँगे्रसचा प्रयत्न आहे, अशी माहिती काँगे्रसचे ज्येष्ठ नेते व ...

गडहिंग्लज : विरोधक एकत्र आले की काय होऊ शकते हे परवाच्या लोकसभा आणि विधानसभांच्या पोटनिवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मोदींचे सरकार पुन्हा येणार नाही, असे भाकीत करतानाच धर्मांध शक्तीविरुद्ध संविधानवाद्यांची मोट बांधून भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा काँगे्रसचा प्रयत्न आहे, अशी माहिती काँगे्रसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी मेळाव्यानिमित्त ते गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभेला वर्षभर अवधी आहे. शिवसेना काय करेल हे सांगता येत नसल्याने राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभा कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र, राज्यात काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रच लढेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.चव्हाण म्हणाले, सरकारच्या अहंकारामुळे, घमेंडखोर वागणुकीमुळे आणि मोदींच्या एकाधिकारशाहीमुळे केवळ भाजपमधील लोक नव्हे, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सत्तेतील मित्रपक्षही त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम कर्नाटक आणि परवाच्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत दिसून आला आहे. त्यापूर्वी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही ते स्पष्ट झाले होते.मोदी सरकारची हुकूमशाही आणि धर्मांध शक्तींच्या पराभवासाठी संविधानवाद्यांची कर्नाटकात एकजूट झाली. त्याचाच परिणाम देशभरातील पोटनिवडणुकीत दिसून आला आहे. संविधान बचावासाठी मोदींच्याविरोधात सर्व समतावादी पक्ष नक्कीच एकत्र येतील. त्यामुळेच देशात मोदींचे राज्य पुन्हा येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.केवळ ग्राहकांना खूश करण्यासाठी साखर आणि अन्य शेतीमालाच्या किमती कमी करून वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा मोदींचा प्रयत्न आहे नव्हे तर देशाच्या विकासाचे त्यांचे ते तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळेच साखर उद्योग अडचणीत आला आहे. किंबहुना, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात कृषी संकट ओढवले असून शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्या भाजप सरकारच्या काळातच झाल्या आहेत. त्याची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही. शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि महागाई कमी करण्यासह त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळेच जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमती कमीझालेल्या असतानाही जीएसटीतील तोटा आणि नोटाबंदीतील नुकसान भरून काढण्यासाठीच इंधनांची दरवाढ केली जात आहे. आघाडीच्या काळात ६० ते ७० हजार कोटी होणारा पेट्रोलियम पदार्थांचा कर यासरकारने २ ते २.५ लाखापर्यंत नेला असून ४ वर्षांत १० लाख कोटींचाकर गोळा केला आहे. त्याची झळ सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.मित्रपक्षांनाही मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा‘साम, दाम, दंड, भेद’ नीतीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी केवळ मतदारांनाच दिलेला नसून मित्रपक्षांनाही दिलेला आहे. शिवसेनेने कितीही घोषणा केल्या तरी त्यांचे काय सांगता येत नाही. पालघरमध्ये शिवसेनेने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली, तशीच भूमिका त्यांची राहिली तरी त्याचे स्वागत आहे, असे सूचक विधानही चव्हाण यांनी केले.