वीस हजारांची लाच घेताना एकास अटक
By Admin | Updated: May 31, 2014 01:15 IST2014-05-31T00:55:46+5:302014-05-31T01:15:15+5:30
चंदगड तहसील कार्यालयातील घटना

वीस हजारांची लाच घेताना एकास अटक
चंदगड : चंदगड तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये उमेदवारीच्या कामावर असलेला भैरू कृष्णा कांगणकर (वय ३०, रा. तावरेवाडी, ता. चंदगड) याला कुळाची जमीन नावावर करून देण्याच्या कामी वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी आज, शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडले चंदगड तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये उमेदवारीच्या कामावर असलेला भैरू कृष्णा कांगणकर याने एका कुळाच्या नावे जमीन नोंद करून देण्यासाठी संबंधित कुळाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी अॅडव्हान्स रक्कम वीस हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज भैरू कागणकर याने संबंधित कुळाकडून वरिष्ठ लिपिक घाग यांच्या सांगण्यानुसार अॅडव्हान्स रक्कम वीस हजार रुपये स्वीकारताना कार्यालयाजवळच त्याला ताब्यात घेतले. कागणकर याने हे पैसे तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक घाग यांच्या सांगण्यावरून आपण स्वीकारल्याचे सांगितल्याची माहिती अधिकार्यांनी सांगितले. कांगणकर याला अटक केली असून, घाग यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)