शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एकदा आमदार... आयुष्यभर पगार; कशाला घ्यायचं टेन्शन, मिळतेय ५० हजाराची पेन्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:48 AM

तुम्ही आमदार म्हणून एकदा शपथ घेतलीत की तुमची कितीही वर्षाची टर्म असो; ती संपल्यानंतर पहिल्या टर्मसाठी ५० हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते....

ठळक मुद्देआवळे यांना ९०, तर महाडिक यांना ७६ हजार!कोल्हापूर जिल्ह्यात दरमहा ५० हजारांप्रमाणे सध्या दरमहा ४१ माजी आमदारांना निवृत्तिवेतन मिळते. विद्यमान आमदारांना दरमहा ६७ हजार पगार मिळतो. खासदारांना केंद्र शासनाकडून एक लाख पगार मिळतो. तुम्ही आमदार म्हणून एकदा शपथ घेतलीत की तुमची कितीही वर्षाची टर्म असो;

>> विश्वास पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात दरमहा ५० हजारांप्रमाणे सध्या दरमहा ४१ माजी आमदारांना निवृत्तिवेतन मिळते. विद्यमान आमदारांना दरमहा ६७ हजार पगार मिळतो. खासदारांना केंद्र शासनाकडून एक लाख पगार मिळतो. तुम्ही आमदार म्हणून एकदा शपथ घेतलीत की तुमची कितीही वर्षाची टर्म असो; ती संपल्यानंतर पहिल्या टर्मसाठी ५० हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते व त्यापुढील प्रत्येक वर्षाला दोन हजारांप्रमाणे निवृत्तिवेतन मिळते. म्हणजे ‘एकदा आमदार अन् आयुष्यभर पगार’ असे त्याचे स्वरूप आहे.

सध्या माजी मंत्री जयवंतराव आवळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक ९० हजार, तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांना ७६ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते. माजी आमदार मालोजीराजे हे कोल्हापूर कोषागार कार्यालयाकडून पेन्शन घेत नसल्याने त्यांची नोंद या कार्यालयाकडे नाही.

सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि त्याच वेळेला केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘शेतकरी सन्मान योजने’चीही घाई सुरू आहे. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी दोन हेक्टरपर्यंत सहा हजार रुपये देण्याच्या योजनेतील पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आचारसंहिताच लागू होणार नाही, अशा हालचाली आहेत. मिळणाऱ्या सहा हजारांचा हिशेब घातल्यास शेतकऱ्याला दरमहा ५०० रुपयेच मिळतात. त्या पार्श्वभूमीवर याच सामान्य जनतेच्या एका मतावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना पगार व पेन्शन किती मिळते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. आमदार स्वत: हयात असतील तर त्यांना ५० हजार पेन्शन मिळते; परंतु ते हयात नसतील तर त्यांच्या फक्त पत्नीसच ४० हजार रुपये मिळतात. त्यांचा मुलगा अज्ञान असेल तर त्यालाही पेन्शनचा लाभ मिळतो. पेन्शनसाठी तुम्ही या जिल्ह्णाचेच आमदार असावे असे नाही.

तुम्ही या जिल्ह्णात स्थायिक झाला असाल तरी तुम्हांला कोल्हापूर कोषागार कार्यालयातून पेन्शन घेता येते. परंतु हे जे ४० माजी आमदार आहेत, ते याच जिल्ह्णातूनच निवडून आलेले आहेत. त्यांच्या पेन्शनपोटी दरमहा २० लाख ५८ हजार ४८० इतकी दिली जात असल्याचे या कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.असाही अनुभव : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना ८४ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते. एन. डी. सर प्राध्यापक होते; परंतु त्याची पेन्शन ते घेत नाहीत. एन. डी. सरांच्या एका अर्जावर सही हवी होती. त्यांचे वय आणि मोठेपण लक्षात घेऊन कोषागार अधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला व सही घ्यायला उद्या घरी येतो असे सांगितले; परंतु ती संधी एन. डी. सर यांनी त्यांना घेऊ दिली नाही. सकाळी ११ वाजता ते स्वत:च वॉकर घेऊन त्या कार्यालयाच्या पायऱ्या चढून गेले. ‘काम माझे आणि अधिकाऱ्याने माझ्याच घरी येणे हे माझ्या तत्त्वात बसत नसल्या’चे त्यांनी सांगितले.देसाईंच्या घरी महिन्याला लाख पेन्शनमाजी आमदार बजरंग देसाई यांना स्वत: आमदार होते म्हणून ६० हजार तर त्यांच्या आई लक्ष्मीबाई देसाई यांना ४० हजार पेन्शन मिळते. बजरंग देसाई यांचे वडील आनंदराव देसाई हे आमदार होते.आमदार दाम्पत्य :श्रीमती संजीवनी गायकवाड यांना स्वत: आमदार म्हणून ५० हजार व पती आमदार म्हणून ४० हजार असे ९० हजार रुपये पेन्शन मिळते.आवाडे कुटुंबीयांत१ लाख३० हजारकल्लाप्पाण्णा आवाडे यांना ५० हजार आणि प्रकाश आवाडे यांना ८० हजार अशी आवाडे कुटुंबीयांत १ लाख ३० हजार रुपये पेन्शन बँकेत जमा होते..................डी. वाय. पाटील हे राज्यपाल असताना त्यांनी आमदार म्हणून मिळणारी पेन्शन घेतली नव्हती. राज्यपाल म्हणूनही ते फक्त एक रुपयाच मानधन घेत होते; शिवाय राज्यपाल निवासस्थानावरील सगळाच खर्च ते स्वत: करीत होते. त्यांना ६२००० रुपये पेन्शन मिळते.पत्नींना प्रत्येकी ४० हजार पेन्शनसंजीवनी सदाशिव शिंदे (कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ)सिंधू नामदेव व्हटकर (वडगाव मतदारसंघ)शोभादेवी अप्पासाहेब नलवडेकृष्णाबाईअप्पासाहेब पाटीलरत्नमालाशिवलिंग घाळीनलिनीकाकासाहेब देसाईजनाबाई तुकाराम कोलेकरसुहासिनीदेवी घाटगेचंद्रकला कल्लाप्पा मलाबादेवसुंधरा रवींद्र सबनीसवत्सलाबाई शामराव पाटील (कागल)मालती श्रीपतराव बोंद्रेराजलक्ष्मी खानविलकरशिवानी देसाईनिवृत्त आमदारांना पेन्शनजयवंतराव आवळे - ९००००राऊ धोंडी पाटील- ५००००नानासाहेब माने- ५००००नामदेवराव भोईटे- ५००००संपतराव पवार- ६००००भरमू सुबराव पाटील- ५००००के. पी. पाटील- ६००००दिनकरराव जाधव- ६२०००बाबासाहेब पाटील-सरुडकर- ६००००पी. एन. पाटील- ५००००श्रीपतराव शिंदे- ६००००राजीव किसनराव आवळे- ५००००महादेवराव महाडिक- ७६०००सुरेश साळोखे- ६००००संजय घाटगे- ५००००विनय कोरे- ७००००सुरेश विठ्ठल पाटील- ६४०००अशोक जांभळे - ५२०००आमदारांच्या पत्नींना प्रत्येकी ४० हजार पेन्शनसंजीवनी सदाशिव शिंदे (कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ)सिंधू नामदेव व्हटकर (वडगाव मतदारसंघ)शोभादेवी अप्पासाहेब नलवडेकृष्णाबाई अप्पासाहेब पाटीलरत्नमाला शिवलिंग माळीनलिनी काकासाहेब देसाईजनाबाई तुकाराम कोलेकरसुहासिनीदेवी घाटगेचंद्रकला कल्लाप्पा मलाबादेवसुंधरा रवींद्र सबनीसवत्सलाबाई शामराव पाटील (कागल)मालती श्रीपतराव बोंद्रेराजलक्ष्मी खानविलकरशिवानी देसाई

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्र