शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:07 IST

विविध रंगी फुलांची अखंड उधळण, पोलिस वाद्यवृंदाच्या सुमधुर स्वरांची झालेली उधळण, भाविकांच्या मुखातून अंबा माता की जयचा जयघोष असे उत्साही तसेच भक्तिमय वातावरण

कोल्हापूर : विविध रंगी फुलांची अखंड उधळण, मानाच्या गायकांनी सादर केलेली गायनसेवा, पोलिस वाद्यवृंदाच्या सुमधुर स्वरांची झालेली उधळण, पायघड्या अंथरण्यात सेवेकऱ्यांची उडालेली धांदल आणि भाविकांच्या मुखातून आपसूक उमटलेले स्वर अंबा माता की जय अशा उत्साही तसेच भक्तिमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा रविवारी रात्री पार पडला. हा पालखी सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी हजारोंचा भक्तिसागर उसळला होता.साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रीमध्ये नऊ दिवस अंबाबाईचा पालखी सोहळा होत असतो. पहिल्याच दिवशी पालखी सोहळ्याला मंदिर परिसरात तसेच मंदिराच्या बाहेर देखील कोल्हापुरातील हजारो भाविक उपस्थित होते. या सोहळ्यात चैतन्यमय तसेच मंगलमय वातावरण होते.प्रदक्षिणेस रात्री साडेनऊ वाजता गणेश मंदिराजवळ पालखीत उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पालखी व देवीचे पूजन झाले. त्यानंतर चोपदाराची ललकारी होताच पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर मानाच्या गायकांनी आपली गानसेवा सादर करण्यास सुरुवात केली. पालखी मंदिर परिक्रमेस जात असताना भाविकांकडून अखंड पुष्पवृष्टी होत होती. दर्शन घेण्याकरिता भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी ठिकठिकाणी चेंगराचेंगरी होत होती. या गर्दीवर कोणाचे नियंत्रण नसल्याने विशेषत: महिला व लहान मुलांचे खूप हाल झाले.गरुड मंडपासमोर देवीला पोलिसांनी मानवंदना दिली. नंतर पालखीतील उत्सवमूर्ती गरुड मंडपातील सदर सिंहासनावर काही क्षण विसावा घेतला. तोफेची सलामी झाली. रात्री साडेदहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात परतली. यावेळी आरती झाली आणि पालखी सोहळ्याची सांगता झाली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर