शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kirnotsav: दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणी

By संदीप आडनाईक | Updated: November 9, 2024 19:37 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज, शनिवारीही ढगांचा अडथळा आल्याने मावळतीची सूर्यकिरणे कशीबशी अंबाबाईच्या ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज, शनिवारीही ढगांचा अडथळा आल्याने मावळतीची सूर्यकिरणे कशीबशी अंबाबाईच्या चरणाच्या थोडी वरपर्यंतच पोहोचू शकली. हवेतील आद्रेतेचे प्रमाणही ६२ टक्के म्हणजे अधिक असल्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमीच राहिली.दक्षिणायणाच्या कालखंडातील पारंपरिक किरणोत्सवाचा आज, शनिवारी पहिला दिवस होता. शुक्रवारी तीन मिनिटे आधीपासून अनुवभता आलेल्या सूर्यकिरणांमध्ये पुरेशी ताकद नसल्यामुळे महाद्वारातून आत येत शेवटी देवीच्या चरणापर्यंत पोहाचलेली किरणे कमकुवत होती. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी अंबाबाईच्या चरणस्पर्श केलेल्या सूर्यकिरणांची तीव्रता १.६ लक्स इतकीच होती. एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीचा पडणारा प्रकाशाला एक लक्स इतके प्रमाण मोजले जाते. थंडी, हवेतील आर्द्रतेत असलेले पाण्याचे जादा प्रमाण आणि ढगाळ वातावरण यामुळे शनिवारची किरणे देवीच्या मुखकमलापर्यंत गेली नाहीत.नेहमीप्रमाणे सूर्यकिरणे सायंकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी पश्चिमेकडील महाद्वारातून मंदिराच्या दिशेने गरुड मंडपाच्या मागे आली. पण त्याची तीव्रता फक्त ५२०० लक्स इतकीच होती, जी शुक्रवारी १३,००० इतकी होती. ५ वाजून ०१ मिनिटांनी किरणांनी चबुतरा पार केला, तेव्हा कालच्या ११,१०१ लक्सच्या तुलनेत त्याची तीव्रता ६३०० राहिली. ५ वाजून २३ मिनिटांनी किरणे गणपती मंदिरापर्यंत चौकात पोहोचली तेव्हा ३४३० लक्सच्या तुलनेत २४५० इतकीच तीव्रता होती. ५ वाजून ३० मिनिटांपासून सूर्यकिरणांची तीव्रता खूपच कमी होत गेली.

पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, गर्भकुटी, कटांजनापर्यंत या किरणांची तीव्रता ३.०९ इतकी कमी राहिली. अखेर ५ वाजून ४३ मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला आणि नंतर किरणे थोडी वर पोहोचली तेव्हा त्याची तीव्रता १.६ इतकीच राहिली. त्यानंतर किरणे उजवीकडे लुप्त झाली. यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लीकर-देसाई, विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, सुदर्शन निवास कुटाले उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर