कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

By समीर देशपांडे | Updated: October 13, 2022 14:27 IST2022-10-13T14:27:26+5:302022-10-13T14:27:52+5:30

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता २०२४ च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल

On behalf of the Shiv Sainiks of the Thackeray group protests against MP Sanjay Mandlik in Kolhapur | कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना भाडोत्री म्हणणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा अनुद्गार काढल्यास त्यांना सळो की पळो करून सोडू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज, गुरूवारी दिला. यावेळी शिवसैनिकांनी मंडलिक यांच्याविरोधात बिंदू चौकात निदर्शने केली.

ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांच्या तपासकामी काल, बुधवारी मुंबई पोलिस कोल्हापुरात आले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना मंडलिक यांनी भाडोत्री हा शब्द वापरला होता. या निषेर्धात शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी खोक्यावर खोकी ठेवून त्यावर गद्दार मंडलिक असे स्टीकर्स छापले होते. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहरप्रमुख रवि इंगवले, शशि बिडकर, मंजित माने यांच्यासह पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

देवणे आणि पवार म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मंडलिक यांना खासदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले आणि याच मंडलिकांनी विश्वासघात केला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता २०२४ च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल. १०० खोके, भाडोत्री संजय मंडलिक ओके ही टॅगलाईन आम्ही घराघरात पोहाचवणार आहोत.

Web Title: On behalf of the Shiv Sainiks of the Thackeray group protests against MP Sanjay Mandlik in Kolhapur