बिंदू चौकातील जुने निगेटिव्ह, नवे कैदी कळंब्यामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 12:54 IST2021-04-13T04:24:31+5:302021-04-13T12:54:42+5:30
Kolhapur Jail CoronaVirus-येथील बिंदूचौक सबजेलमधील ५० निगेटिव्ह कैद्यांना सोमवारी कळंबा कारागृहात पाठविण्यात आले आहे, तसेच नव्या सर्व कैद्यांना यापुढे कळंबा कारागृहातच पाठविण्यात येणार आहे. कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी ही माहिती दिली.

बिंदू चौकातील जुने निगेटिव्ह, नवे कैदी कळंब्यामध्ये
कोल्हापूर -येथील बिंदूचौक सबजेलमधील ५० निगेटिव्ह कैद्यांना सोमवारी कळंबा कारागृहात पाठविण्यात आले आहे, तसेच नव्या सर्व कैद्यांना यापुढे कळंबा कारागृहातच पाठविण्यात येणार आहे. कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी ही माहिती दिली.
बिंदू चौक येथील ३१ कैदी रविवारी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे त्यांना कोठेही न हलवता त्याच ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने सोमवारी या सबजेलमध्ये औषध फवारणी केली आहे.
यापुढे एकाही नव्या कैद्याला बिंदू चौक सबजेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सध्या पॉझिटिव्ह असलेल्या काही कैद्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्यांच्यावर पुढील उपचार करण्यासाठी सीपीआर प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.