महागाव येथील वृद्धेचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 12:01 IST2021-05-29T12:00:41+5:302021-05-29T12:01:57+5:30
Accident Kolhapur : हातपाय धुण्यासाठी तलावात गेली असता तोल जावून किंवा पाय घसरुन पाण्यात पडल्यामुळे वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यु झाला.शेवंता केशव परीट (वय ७५, रा.महागाव ता.गडहिंग्लज) या वृद्धेचे नांव आहे.

महागाव येथील वृद्धेचा तलावात बुडून मृत्यू
गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी तलावात गेली असता तोल जावून किंवा पाय घसरुन पाण्यात पडल्यामुळे वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यु झाला.शेवंता केशव परीट (वय ७५, रा.महागाव ता.गडहिंग्लज) या वृद्धेचे नांव आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शेवंता या दररोज सकाळी फिरायला जात होत्या . शुक्रवारी पहाटे
नेहमीप्रमाणे त्या फिरायला गेल्या होत्या. फिरुन येताना गावातील परशराम तलावावर त्या हातपाय धुण्यासाठी गेल्या होत्या.हातपाय धुत असताना तोल जावून किंवा पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या.
दरम्यान, पोटात पाणी गेल्यामुळे आणि पोहता न आल्यामुळे बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.सकाळी त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला. पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शेवंता यांच्या पतीचे कांही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.सुनिल यादव यांच्या वर्दीवरुन गडहिंग्लज पोलीसात या घटनेची नोंद झाली आहे.