Old farmer kills | तुटलेल्या विद्युततारेचा धक्क्याने वृद्ध शेतकरी ठार
तुटलेल्या विद्युततारेचा धक्क्याने वृद्ध शेतकरी ठार

ठळक मुद्देतुटलेल्या विद्युततारेचा धक्क्याने वृद्ध शेतकरी ठार केर्ली येथील दुर्घटना

कोल्हापूर : विद्युतवाहिनीच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून वृद्ध शेतकरी ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी केर्ली (ता. करवीर) येथे घडली. बाळू बिरू माने (वय ८०, रा. केर्ली) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, केर्लीमध्ये वडगाव पाणंद येथे शेतामध्ये भुईमूग काढण्यासाठी बाळू माने हे गुरुवारी सकाळी गेले होते. त्यांच्यासोबत महिला कामगारही होत्या. बाळू माने हे पाणंदीमध्ये आले असता तेथे शेतात विजेची तार तुटून पडली होती.

रस्त्यावर पालापाचोळ्यात तुटलेली प्रवाहित तार गुरफटल्याने ती सहजासहजी निदर्शनास येत नव्हती. त्या तारेचा धक्का बसल्याने माने बेशुद्ध पडले. सोबतच्या भयभीत झालेल्या महिलांनी त्याबाबतची माहिती गावात कळविली.

ग्रामस्थांनी माने यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ‘सीपीआर’मध्ये नोंद झाली आहे.
 

 


Web Title: Old farmer kills
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.