शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बाप्पांच्या विसर्जनात पुराचा अडथळा,नदीऐवजी इराणी खणीत विसर्जनाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:22 AM

पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे यंदा सार्वजनिक गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर असल्याने विसर्जन करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार असल्याने पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत गणपती विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका सूत्रांनी केले आहे.

ठळक मुद्देबाप्पांच्या विसर्जनात पुराचा अडथळानदीऐवजी इराणी खणीत विसर्जनाचे आवाहन

कोल्हापूर : पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे यंदा सार्वजनिक गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर असल्याने विसर्जन करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार असल्याने पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत गणपती विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका सूत्रांनी केले आहे.पंचगंगा नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला असून, पाण्याची पातळी ३९ फूट ११ इंचावर आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती स्थिर असून, नदीचे पाणी ओसरण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी पुराचे पाणी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याच्या पुढे होते.

पंचगंगा घाट पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. शिवाय गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता वाहतुकीस बंद होता; त्यामुळे अशा परिस्थितीत गणपती विसर्जन अशक्य आहे. शिवाय मिरवणुकीतील वाहने विसर्जन झाल्यानंतर शिवाजी पूल, जुना बुधवार तालीममार्गे सोडली जातात. मात्र गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावर पाणी असल्याने तेथून पुढे वाहने नेणेही धोक्याचे आहे.पुराचे पाणी ओसरल्यानंतर तत्काळ जामदार क्लब ते पंचगंगा नदीघाट परिसरातील स्वच्छता, गाळ बाजूला करणे हे एक आव्हान आहे. जरी आज बुधवारी, दुपारपर्यंत पाणी ओसरले तरीही कमी वेळात सुविधा निर्माण करणे अशक्य आहे. म्हणूनच पुराचे वाढलेले पाणी, वाहतुकीस रस्ता बंद असल्यामुळे गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहे.शहरातील पूरस्थिती पाहता यंदा सर्वच मंडळांनी आपले गणपती पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. इराणी खणीवर विसर्जनाकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच तेथे लोखंडी बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावर तसेच विसर्जनस्थळी लागणाºया अत्यावश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत करून देण्यात आलेल्या आहेत.विसर्जन तयारी युद्धपातळीवर -

  •  विसर्जन मार्गावरील रस्ते पॅचवर्क सुरू
  •  विसर्जन मार्गावर पथदिव्यांची दुरुस्ती पूर्ण
  • शहरात विविध ठिकाणी २०० नवीन एलईडी बल्ब लावले.
  • शहरात पोलिसांकरिता १० टेहाळणी मनोरे
  •  अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या
  •  पानसुपारी व निरोपाचे नारळ देणाऱ्या मंडळांना परवानगी
  •  इराणी खण येथे बॅरिकेटस्, वीजेची सोय
  • अग्निशमन दलाची पथके असणार तैनात
  • २४ तास रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा

हॉकी स्टेडियममार्गे सोडणारज्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता विसर्जनासाठी जायचे आहे, ती मंडळे सावित्रीबाई फुले रुग्णालय ते हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, देवकर पाणंदमार्गे इराणीकडे जाऊ शकतात. त्यांना तो खुला असेल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर