शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहा गुंठ्यांचाही आता नकाशा मिळणार, आधारसारखा यूएलपीएन नंबर होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'या' तालुक्यापासून सुरुवात

By भीमगोंड देसाई | Updated: March 18, 2026 12:31 IST

जमीन पोटहिश्शाची मोफत मोजणी : ‘जेवढा नकाशा तेवढा सातबारा’ होणार

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शेतजमीन पोट हिस्सा मोजणी व नकाशा अद्ययावतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची निवड भूमी अभिलेख प्रशासनाने केली आहे. यांतर्गत पुढील आठवड्यात गडहिंग्लजमधील कसबा नूल, निलजी, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ या गावांत प्रत्यक्ष शेत जमिनींची मोफत मोजणी करून कमीत कमी दहा गुंठे बागायती आणि २० गुंठे जिरायत जमिनीचे पोटहिस्से आणि नकाशे तयार करण्यात येणार आहे.

प्रत्येक हिश्शाला आधारसारखा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक (यूएलपीएन) मिळणार आहे. यातून जेवढा नकाशा तेवढाच सातबारा तयार करण्यात येणार आहे. परिणामी शेतीच्या हद्दीवरून, क्षेत्रावरूनचे वाद संपणार आहेत, असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे.नकाशा आणि सातबाऱ्यातील क्षेत्रात तफावत असल्याने केंद्र आणि राज्याच्या शेतीसंबंधीच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत. यामुळे केंद्र शासनाच्या विशेष साहाय्य योजनेंतर्गत पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पोटहिश्शाला यूएलपीएन नंबर दिला जाणार आहे. सध्याचा गट, सर्व्हे नंबर नाहीसा हा युनिक नंबरच जमिनीची ओळख बनणार आहे. जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. गडहिंग्लजचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शेत जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी होणार आहे.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निश्चित होणार...पोट हिस्सा मोजणीवेळी संबंधित गावातील सरकारी, गायरान, स्मशानभूमीच्या जमिनीचीही मोजणी होणार आहे. या जमिनीवरील अतिक्रमणही निश्चित करण्यात येणार आहे. याचा अहवाल भूमी अभिलेख प्रशासन महसूल प्रशासनास देणार आहे.

मोजणीत पाच सेमीपर्यंत अचूकता..अत्याधुनिक रोव्हरच्या साहाय्याने मोजणी केली जाणार असल्याने क्षितीज समांतरापासून पाच सेमीपर्यंतची अचूकता येणार आहे. उभी अचूकता दहा सेमीपेक्षा कमी असणार आहे. यामुळे नकाशा आणि सातबारातील क्षेत्राचा मेळ बसवणे शक्य होणार आहे.

प्रत्यक्ष मोजणीचे काम असे होणार.....

  • पोटहिस्सा मोजणीच्या दिनांकास सातबारामधील नावानुसार पोटहिस्सा मोजणी होणार.
  • जाग्यावरील सर्व्हे नंबर, गटनंबरचे मूळ कायम दगड आणि जमिनीसंबंधी डिजिटल डेटा विचारात घेण्यात येणार आहे.
  • नव्याने तयार झालेला पोटहिस्सा मूळ सर्व्हे, गटनंबरच्या नकाशावर जीआएस प्लाटफार्मवर सुपर इम्पोजेशन तयार होणार
  • जमीन मालकीवरून न्यायालयात वाद असेल, तर मोजणी होणार नाही.
  • पोटहिस्सा मोजणीवेळी वाद, क्षेत्रात घोळ, हद्दीत फेरफार असेल तर सक्षम अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देणार.

शेतजमिनीचा मोफत पोटहिस्सा मोजणी, नकाशा अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात याला गडहिंग्लज तालुक्यातून पुढील आठवड्यात सुरुवात होईल. जमीनधारकांनी प्रत्यक्ष हजर राहून जमिनीची वहिवाट, जुन्या हद्दी, ढेपण, दगड दाखवाव्यात. - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Land Mapping Initiative: ULPIN for Ten Gunthas, Kolhapur Pilot

Web Summary : Kolhapur's Gadhinglaj starts free land mapping. Each plot gets a unique ULPIN, like Aadhaar. This resolves land disputes and aligns records, aiding government schemes. Accurate measurements ensure precise maps, preventing encroachment.