शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

काय सांगता! आता चहा पिऊन झाल्यावर कप बिनधास्त खा, कोल्हापुरात बिस्किट कपची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 5:29 PM

Food Tea Cup Kolhapur- लॉकडाऊनच्या कालावधीत हैदराबादमधून या कप निर्मितीसाठीचे मशीन बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची निर्मिती जानेवारीपासून सुरू केली आहे.

ठळक मुद्देपुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स निर्मिती करण्याचं ध्येयसर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत खाण्यायोग्य कप निर्मितीचा निर्णयसध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत

कोल्हापूर : कॅफे, रेस्टॉरंटमध्ये अथवा टी-स्टॉलवर चहा, कॉफी पिऊन झाल्यानंतर त्याचा कागदी कप सर्रासपणे टाकून दिला जातो. मात्र, कोल्हापुरात आता चहा, कॉफी घेतल्यानंतर त्याचा कपही खाता येणार आहे. येथील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे, राजेश खामकर यांनी पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती करून प्लास्टिक, कागदी कपला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.एडिबल कटलरी निर्मितीची संकल्पना मॅकेनिकल इंजिनिअर दिग्विजय यांना सुचली. त्यावर याबाबतची माहिती त्यांनी ऑनलाईन शोधली. त्यातून हैदराबाद, गुजरातमध्ये उत्पादित होणारे खाण्यायोग्य चमचे, कप त्यांनी मागविले. त्याचा दीड वर्षे अभ्यास केला. त्यातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत खाण्यायोग्य कप निर्मितीचा निर्णय त्यांनी घेतला.

लॉकडाऊनच्या कालावधीत हैदराबादमधून या कप निर्मितीसाठीचे मशीन बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची निर्मिती जानेवारीपासून सुरू केली आहे. सध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत. पुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स आदींची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.झिरो वेस्ट तत्त्वावर निर्मितीमॅग्नेट एडिबल कटलरी या ब्रँडच्या माध्यमातून या बिस्कीट कपची निर्मिती आम्ही केली आहे. त्यासाठी मित्र सिद्धार्थ बुधवंत, युवराज राऊत यांचीही मोठी मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, विजय सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस यांचे सहकार्य लाभले. मैदा, साखर, कॉर्न फ्लॉवर, इसेंस, आदींच्या वापरातून झिरो वेस्ट तत्त्वावर तयार केलेला हा कप एक महिन्यापर्यंत वापरता येतो. त्याची किंमत अडीच रुपये आहे. चहा, कॉफी, आदी पेय घेतल्यानंतर हा कप चवीने खाऊ शकतो. कचरा म्हणून टाकल्यास त्यामुळे पर्यावरणाला धोका होत नसल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.स्वत: मशीन निर्मिती करणारपरवडणाऱ्या दरात आणि मोठ्या प्रमाणात या बिस्कीट कपचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कप निर्मितीचे तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे मशीन बनविण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. त्याचा आराखडा तयार झाला असून येत्या चार महिन्यांमध्ये हे मशीन बाजारपेठेत आम्ही उपलब्ध करून देणार असल्याचे दिग्विजय यांनी सांगितले. 

टॅग्स :foodअन्नkolhapurकोल्हापूर