नोटिसा देणार्या सर्वेअर्सना व्यापार्यांची धक्काबुक्की
By Admin | Updated: May 31, 2014 01:13 IST2014-05-31T01:02:01+5:302014-05-31T01:13:21+5:30
तावडे हॉटेल अतिक्रमण : स्थायी सभेत पडसाद; फौजदारीचे आदेश

नोटिसा देणार्या सर्वेअर्सना व्यापार्यांची धक्काबुक्की
कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरात नोटिसा बजावण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या सर्वेअरर्सना काही व्यापार्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार काल, गुरुवारी घडला होता. संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी महापालिकेच्या आज, शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिले तसेच तावडे हॉटेलप्रकरणी दररोजच्या घडामोडींचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. लाचप्रकरणी नाव घेतलेल्या उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी माघारी स्थायी सदस्यांबद्दल अनुद्गार काढल्याने संपापलेले सदस्य अक्षरश: चव्हाण यांच्यावर धावून गेले. चव्हाण यांनी माफी मागितल्याने घडल्या प्रकारावर पडदा पडला. तावडे हॉटेल परिसरातील कारवाईवेळी वगळलेल्या काही मोठ्या मिळकतधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी महापालिकेचे कर्मचारी नोटिसा बजावताना यावेळी त्यांना विरोध करत व्यापार्यांनी धक्काबुक्की केली. याचा निषेध स्थायी बैठकीत करण्यात आला. संबंधित व्यापार्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश सभापती सचिन चव्हाण यांनी दिले. लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पाटोळे या मुकादमाने नाव घेतलेल्या उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण व कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना मागील स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानंतर रावसाहेब चव्हाण यांनी स्थायी सदस्यांबाबत अनुद्गार काढल्याची कुणकुण सदस्यांना लागली. आजच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. चव्हाण यांना सदस्यांनी अक्षरश: धारेवर धरले.