शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या; आमदार प्रकाश आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आग्रह

By विश्वास पाटील | Published: March 09, 2024 6:55 PM

सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत

कोल्हापूर : सर्वसामान्यांचे खासदार म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची ओळख आहे. त्यांनी खासदारकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय मंडलिक यांना माननारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. ही स्वाभीमानी जनता खासदार संजय मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याचा विकास केला असून त्यांच्याकडे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार मंडलिक यांचेकडूनही तीच अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत. यासाठीच आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाSanjay Mandalikसंजय मंडलिकPrakash abitkarप्रकाश आबिटकर