Kolhapur: खंडपीठाबाबत कोणताही निर्णय नाही, खंडपीठ कृती समितीचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:06 IST2025-07-17T16:04:08+5:302025-07-17T16:06:01+5:30
काही प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत खंडपीठ कृती समितीने प्रसिद्धीपत्रक काढले

Kolhapur: खंडपीठाबाबत कोणताही निर्णय नाही, खंडपीठ कृती समितीचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : 'मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाकडून कोणतीही माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन किंवा खंडपीठ कृती समितीला मिळालेली नाही. अधिकृत निर्णय होताच याची माहिती जाहीर केली जाईल,' असे खंडपीठ कृती समितीने बुधवारी (दि. १६) प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ लवकरच कोल्हापुरात सुरू होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काही प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. याबाबत खंडपीठ कृती समितीने बुधवारी प्रसिद्धीपत्रक काढले. 'कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होणार, अशा आशयाच्या बातम्या काही दैनिके आणि वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
तथापि, याबाबत कोणतीही माहिती मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाकडून खंडपीठ कृती समितीला प्राप्त झालेली नाही,' असे त्यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे. कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक दिले.