शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या व्यायामशाळा अशक्त--जागा मोठ्या, मात्र उपस्थिती कमीच

By admin | Updated: February 19, 2015 00:25 IST

नव्वदीच्या खरेदीतील साहित्यावर होतोय व्यायाम...उपस्थिती वाढीसाठी शून्य प्रयत्न

सचिन भोसले- कोल्हापूर  महापालिकेने तरुणांना व्यायामाची गोडी लागावी म्हणून कोल्हापूर शहरात नव्वदीच्या दशकात व्यायामशाळा सुरू केल्या. मात्र, योग्य नियोजनाअभावी या व्यायामशाळा ओस पडू लागल्या आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बहुतांशी व्यायामशाळा केवळ शोभेच्या इमारती बनून राहिल्या आहेत. तत्कालीन महापालिका महासभेने शहरातील काही भागांत उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या जागेत व्यायामशाळांची निर्मिती केली. तत्कालीन आमदार बाबूराव धारवाडे यांच्या निधीतून या व्यायामशाळांना साहित्यही पुरविण्यात आले. मात्र, यानंतर साहित्याची नव्याने डागडुजी किंवा त्यात भर घातली नाही. परिणामी या व्यायामशाळांकडे युवकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ४ ते ८ या वेळेत या व्यायामशाळा उघड्या असतात. प्रशिक्षक नसल्यास व्यायामासाठी आलेल्या तरुणांकडून उघडल्या व बंद केल्या जातात. सध्या बावडा उलपे हॉल, शाहूपुरी, विक्रमनगर या व्यायामशाळेत नव्याने साहित्याची खरेदी केली आहे. अन्य ठिकाणी जुन्या साहित्यांवर युवक व्यायाम करत आहेत.नव्वदीच्या खरेदीतील साहित्यावर होतोय व्यायामसुरुवातीच्या काळात जेवढे व्यायाम साहित्य या व्यायामशाळेत घेतले, तितकेच व्यायामाचे साहित्य या शाळांमधून आहे. नव्याने केवळ शाहूपुरी, उलपे मळा, विक्रमनगर या व्यायामशाळांत नवीन अत्याधुनिक साहित्य खरेदी केले आहे. बाकीच्या व्यायामशाळांत पूर्वीचेच व्यायाम साहित्य आहे. उपस्थिती वाढीसाठी शून्य प्रयत्नमोक्याच्या जागी असणाऱ्या या व्यायामशाळेत युवकांची गर्दी व्हावी, त्यातून व्यायामाची गोडी वाढावी, याकरिता महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून कोणतेही प्रयत्न आजतागायत केलेले नाहीत. यातील काही प्रशिक्षकांना तर अतिक्रमण काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांसारखे अधिकाऱ्यांबरोबर पाठविले जाते.कर्मचारी संख्याया व्यायामशाळांकडे एकूण १५ प्रशिक्षक होते. त्यातील एक प्रशिक्षक मागील वर्षी निवृत्त, तर दोन कर्मचारी रोजंदारीवर, तर एक कर्मचारी बॅडमिंटन कोर्टकडे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. व्यायामशाळांचे सर्व व्यवहार इस्टेट विभागाकडून पाहिले जातात. कर्मचाऱ्यांची हजेरीही या विभागात मिळत नाही. त्याचबरोबर कर्मचारी कामावर आहे की नाही, हेही कळत नाही. त्यामुळे व्यायामशाळांच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे हेच कळत नाही.शहरात १४ व्यायामशाळामहापालिकेच्या वरुणतीर्थ, दुधाळी, फुलेवाडी, मंगळवार पेठ (नागेशकर), हळदकर, आंबेडकर व्यायामशाळा, उलपे मळा (बावडा), बावडा पॅव्हेलियन, भोसलेवाडी, जाधववाडी, विक्रमनगर, राजारामपुरी, गवत मंडई, शाहूपुरी व्यापारपेठ व्यायामाचे धडे चालतात १९९० च्या खरेदी केलेल्या साहित्यावर उलपे मळा, शाहूपुरी, विक्रमनगर येथेच केवळ नवीन साहित्यजागा मोठ्या, मात्र उपस्थिती कमीच