शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरोत्थान’चे नऊ कोटी अडकले टक्केवारीत

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

प्रशासनाचा कारभार : महापालिकेसह कागल, वडगाव, ंमुरगूड नगरपालिकांची निधी

विश्वास पाटील - कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून मंजूर केलेला सुमारे नऊ कोटींचा निधी नगरपालिका प्रशासनाने अडवून ठेवला आहे. हा निधी कंत्राटदारांकडून एक टक्का रक्कम मिळावी यासाठी रोखून ठेवल्याची तक्रार आहे. महापालिका व संबंधित नगरपालिकांनी निधीचे वापर प्रमाणपत्र (युटिलायझेशन सर्टिफिकेट) न दिल्यानेच हा निधी त्यांना वितरित केला नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन मंडळाची उद्या, शुक्रवारी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर चर्चेची शक्यता आहे.राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेसाठी जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २०१३-१४ साली १४ कोटी ५० लाख व २०१४-१५ साठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचा पहिल्या वर्षाचा ५७ लाखांचा निधी व दुसऱ्या वर्षाचा ४ कोटी ९९ लाख ९६ हजार ३५७ रुपयांचा निधी शासनाने वितरित केला. जिल्हा नियोजन विभागाकडून २०१४-१५ योजनेचे ६ कोटी ५० लाख रुपये १९ मे २०१४ रोजी नगरपालिका प्रशासनाकडे वितरित केले. उर्वरित सर्व निधी ११ नोव्हेंबर २०१४ च्या आदेशान्वये वितरित केला. या निधीपैकी ८ कोटी ९० लाख ८ हजार ९५० रुपये नगरपालिका प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा कोषागार कार्यालयातून काढले आहेत; परंतु ही रक्कम महापालिका व संबंधित तीन नगरपालिकांना आज अखेर मिळालेली नाही. ही रक्कम जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) यांच्या आहरण आणि वितरण (डीडीओ) खात्यावर पडून आहे. याचा अर्थ कोषागार खात्यातून रक्कम काढून २३ दिवस झाले, तरी ती वितरित करण्यात आलेली नाही. आता नगरपालिका प्रशासन म्हणते की, महापालिकेने निधीचे वापर प्रमाणपत्र दिले नाही म्हणून निधी वितरित केलेला नाही. ते खरे असले, तरी मग निधी वितरित करायचा नसताना तो कोषागार कार्यालयातून काढला तरी का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. तरीही ही रक्कम आज २३ दिवस जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या खात्यावर पडून आहे. गावस्तरावर बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांकरिता सामाजिक सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. या समित्या २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन स्थापन करावयाच्या आहेत. संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या गावातील बालकांच्या सुरक्षा व विकासाला प्राधान्य देऊन याबाबतचा ठराव २६ जानेवारीच्या ग्रामसभेत घेऊन ग्राम बालसंरक्षण समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शकील शेख यांनी केले आहे.