शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सअॅपवरील तक्रार’ उपक्रमाचे नव्याचे नऊ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी बदलले की त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात. नवी निवड झाली किंवा ...

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी बदलले की त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात. नवी निवड झाली किंवा बदली होऊन नवे अधिकारी आले की थोड्या दिवसांत काही उपक्रम जाहीर केलेे जातात. परंतु नंतर ते बंद पडतात. ‘व्हॉट्सअॅपवरील तक्रार’ या उपक्रमाची हीच अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत असा काही उपक्रम होता हेही आता कोणाच्या लक्षात राहिलेले नाही.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविकांत आडसूळ हजर झाल्यानंतर त्यांनी ‘दिव्यांग उन्नती अभियान’ यशस्वी केले. त्यानंतर त्यांनी ‘व्हॉट्सअॅपवर तक्रार’ हा उपक्रम सुरू केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामकाजाबाबत काही तक्रार असल्यास ती ८६०५२७९९०० या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठवायची. त्याची दखल घेऊन संबंधित तक्रारी सामान्य प्रशासन विभागाकडून त्या त्या विभागाला पाठवल्या जायच्या व त्याबाबत पुढील कार्यवाही केली जात होती.

हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर काही महिने या क्रमांकावर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाऊ लागली. त्यावर कार्यवाही होऊ लागली. प्रशासनाच्या नियमित बैठकांमध्ये आढावाही घेतला जाऊ लागला. मात्र रविकांत आडसूळ यांच्या बदलीनंतर हा उपक्रमच मागे पडला. दरम्यानच्या काळात कोरोनाची दुसरी लाटही सुरू झाली. अनेक विषयांप्रमाणे हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला होता हे देखील कोणाच्या आता लक्षात नाही.

चौकट

सगळेच नवीन

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक असताना हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर बजरंग पाटील अध्यक्ष बनले. तर आता राहुल पाटील अध्यक्ष आहेत. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल होते आता संजयसिंह चव्हाण आहेत. आडसूळ यांच्या ठिकाणी मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सामान्य प्रशासनकडे कार्यरत आहेत. मग जुन्या उपक्रमाचा आग्रह धरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोट

असा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला होता. परंतु त्याचे नंतर काय झाले हे समजले नाही. जर नागरिकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत होता तर हा उपक्रम पुन्हा सुरू करावा.

राजवर्धन निंबाळकर

जिल्हा परिषद सदस्य

चौकट

व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या एकूण तक्रारी १२३

निर्गत झालेल्या तक्रारी ८८

प्रलंबित तक्रारी ३५

चौकट

सर्वाधिक तक्रारी ग्रामपंचायतींबद्दल

एकूण दाखल १२३ तक्रारींपैकी सर्वाधिक ४१ तक्रारी ग्रामपंचायत विभागाकडे दाखल झाल्या आहेत. यातील २७ तक्रारींची निर्गत करण्यात आली असून १४ प्रलंबित आहेत. ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराबाबत यातील बहुतांशी तक्रारी आहेत.