नूतन केंद्रीय मंत्र्यांचा रवळनाथ सोसायटीतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:55 IST2021-08-02T12:53:46+5:302021-08-02T12:55:07+5:30

Minister delhi Kolhapur : केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील नूतन मंत्र्यांचा श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिल्ली येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

New Union Ministers felicitated by Ravalnath Society | नूतन केंद्रीय मंत्र्यांचा रवळनाथ सोसायटीतर्फे सत्कार

दिल्ली येथे रवळनाथतर्फे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचा एम. एल. चौगुले यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी शिवाजी पाटील, वासुदेव मायदेव उपस्थित होते.

ठळक मुद्देनूतन केंद्रीय मंत्र्यांचा रवळनाथ सोसायटीतर्फे सत्कारघरबांधणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रवळनाथचे कौतुक

गडहिंग्लज : केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील नूतन मंत्र्यांचा श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिल्ली येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्ली येथील मराठी संस्था, दिल्ली येथील अधिकारी पुढले पाऊल, इन्स्टिट्युट आॅफ पॉझीटीव्हीटी इंडियन डायस्पोरा क्लब या संस्थांतर्फे महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांचा रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.
यावेळी चौगुले यांनी सर्व मंत्र्यांना घरबांधणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रवळनाथचे कौतुक केले.

यावेळी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सहसचिव शिवाजी पाटील, रवळनाथचे उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव उपस्थित होते.

 

 

 

Web Title: New Union Ministers felicitated by Ravalnath Society