नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:56 AM2018-01-15T00:56:00+5:302018-01-15T00:58:49+5:30

New Textile Policy Soon | नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच

नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच

Next


इचलकरंजी : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत शेतकºयांसाठी कर्जमाफीबरोबर अनेक सुविधा पुरविल्या. आता वस्त्रोद्योगाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग धोरण लवकरात लवकर घोषित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
डीकेटीई व रोटरी क्लब सेंट्रल आयोजित ‘टेक्स्पोजर २०१८’ या वस्त्रोद्योग विषयक प्रदर्शनास रविवारी भेट दिल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, आता शहरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. वस्त्रोद्योग हा सुलभ रोजगार देणारा उद्योग असल्यामुळे तो शासनाच्यादृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. म्हणून शासनाचा वस्त्रोद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा आहे.
यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, वस्त्रोद्योगाला राज्य व केंद्र अशा दोन्ही सरकारचे पाठबळ पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यामध्ये शेतीखालोखाल रोजगार देणाºया वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी, अशीही मागणी हाळवणकर यांनी केली. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील, चौंडेश्वरी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील सांगले, आदींसह विविध मान्यवरांनी या प्रदर्शनास भेटी दिल्या. प्रदर्शनाचा रविवार हा शेवटचा दिवस असल्यामुळे उद्योजक व व्यावसायिक, त्याचबरोबर वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञ, कामगार, आदींनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रदर्शन रात्री उशिरापर्यंत लोकांसाठी खुले ठेवण्यात आले होते.

Web Title: New Textile Policy Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.