शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ नगरसेवकांच्या जागी नवीन पदाधिकारी येणार

By admin | Updated: July 11, 2015 00:10 IST

महापालिका : २० जुलैला सभेत शिक्कामोर्तब

कोल्हापूर : जातीच्या अवैध दाखल्यामुळे नगरसेवकपद गमावलेले स्थायी समितीचे सदस्य सचिन चव्हाण व दिगंबर फराकटे, तसेच परिवहन सदस्य व महिला बालकल्याण उपसभापती रेखा आवळे यांच्या रिक्त जागा भरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सोमवारी (दि. २०) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.गेली चार वर्षे न्यायालय व जात पडताळणी समितीच्या दणक्याने कॉँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती व सदस्य सचिन चव्हाण व दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २३, २५ (९), ३० (५) नुसार या रिक्त जागी उर्वरित कालावधीसाठी प्रमाणशीर पद्धतीने नामनिर्देशाद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा आवळे यांचाही दाखला बोगसगिरीने रद्द झाला. त्या परिवहन समिती सदस्य व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती होत्या. त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादीतर्फे दोन सदस्यांची निवड केली जाणार आहे. २० जुलैला होणाऱ्या सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. (प्रतिनिधी)वर्षात चार नगरसेवक बाहेरजात पडताळणीमुळे दाखल्याची बोगसगिरी उघड झाल्याने व न्यायालयाच्या दणक्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना महापालिकेच्या राजकारणातून ‘आउट’ व्हावे लागले. राष्ट्रवादीच्या माजी महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणामुळे नगरसेवकपद गमवावे लागले. न्यायालयाने २०१० ची निवडणूकच रद्द केल्याने कॉँग्रेसच्या दिगंबर फराकटेंचे नगरसेवकपद गेले; तर सचिन चव्हाण व रेखा आवळे यांचा दाखला बोगस ठरल्याने त्यांना पद गमवावे लागले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत चार नगरसेवकांवर पद गमाविण्याची वेळ आली.