शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

तीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी न्यू महाराष्ट्र ग्रॅनाईटच्या संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 9:47 PM

Crime News Police Kolhapur- साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला होता. या फसवणूक प्रकरणी संस्थेचा फरार संचालक कुमार आकाराम कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) याला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्दे तीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी न्यू महाराष्ट्र ग्रॅनाईटच्या संचालकास अटक आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : अद्याप दोन संचालक फरार

कोल्हापूर : साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला होता. या फसवणूक प्रकरणी संस्थेचा फरार संचालक कुमार आकाराम कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) याला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.साजणी (ता. हातकणंगले) येथे न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्था हे युनिट २००९ मध्ये सुरू केले होते. शासनाकडून सुमारे तीन कोटी रुपयांहून जादा अनुदान घेऊन हे युनिट सुरू झाले होते. पुढे ते बंद पडले. शासनाच्या वतीने लेखापरीक्षकांनी या संस्थेचे २०१० ते २०१८ या कालावधीचे लेखापरीक्षण केले.

त्यामध्ये शासनाची तीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यामुळे शासनाच्या वतीने संस्थेचे चेअरमन तुळशीदास देसाई-कांबळे, सचिव अरविंद मुरुडकर व संचालक कुमार कांबळे यांच्याविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गतवर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला; पण संशयित आरोपी फरार होते.दरम्यान, साजणी येथील बंद पडलेल्या युनिटचा ताबा पोलिसांनी पंचनामा करून सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सुपूर्द केला. संशयित आरोपी कुमार कांबळे याने इचलकरंजी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याच वेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस हवालदार दिनेश उंडाळे हे संशयिताच्या मागावरच होते.

या पोलीस पथकाने सायबर विभागाची मदत घेऊन संशयित आरोपीला शोधण्यासाठी इचलकरंजी, सांगली, मिरज भाग पिंजून काढला. मंगळवारी पहाटे त्याला जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने पकडले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर