शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:57 IST

गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कामासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ कोल्हापूर (शिरोली) ते सांगली (अंकली) या ३३.८३५ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची (८४० कोटींचा प्रकल्प) माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गुरुवारी घेतली. कर्नाटकातील बोरगाव येथील प्रचारसभेसाठी ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात आले होते. सकाळी १२ वाजता ते कोल्हापूर विमानतळावर खासगी हेलिकॉप्टरने आले आणि बोरगाव येथील कार्यक्रम आटाेपून दुपारी २:३० वाजता त्यांनी नागपूरकडे प्रयाण केले. खासदार महाडिक बोरगावहून त्यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळापर्यंत सोबत होते.कोल्हापूरपर्यंतच्या प्रवासात गडकरी यांनी महाडिक यांच्याशी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली.गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते. वाढत्या रहदारीमुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली, त्यामुळे हा मार्ग प्रवासासाठी अडचणीचा ठरत होता. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्यासाठी आता नवा ठेकेदार नेमण्यात येऊन हे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.

विमानतळाची घेतली माहिती

कोल्हापूर विमानतळाचा विकास होत असून, येथील वर्दळ विचारात घेऊन विमानतळ मार्गाच्या चौपदरीकरणाचा विचार गडकरी यांच्याकडे खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. सध्या या विमानतळावरून ७ विमानांचे उड्डाण होते आणि पुढील महिन्यात नागपूर, इंदूर विमानसेवा सुरू होणार असल्याबद्दलही गडकरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी