शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कागल, करवीरमधील ९४ गावांतील मालमत्तांची नव्याने मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 7:14 PM

मालमत्तांच्या जागांवरून तक्रारी व वादाचे प्रसंग घडत असल्याने कागल तालुक्यातील ३९ आणि करवीर तालुक्यातील ५५ अशा ९४ गावांची नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखाच्या बैठकीनंतर पुढील महिन्यात मोजणीचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देकागल, करवीरमधील ९४ गावांतील मालमत्तांची नव्याने मोजणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पुढील महिन्यात होणार मोजणी

कोल्हापूर : मालमत्तांच्या जागांवरून तक्रारी व वादाचे प्रसंग घडत असल्याने कागल तालुक्यातील ३९ आणि करवीर तालुक्यातील ५५ अशा ९४ गावांची नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भूमी अभिलेखाच्या बैठकीनंतर पुढील महिन्यात मोजणीचे आदेश देण्यात आले.बैठकीत भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तारखेस घराच्या व इतर मालमत्तेच्या बिनचूक मोजणीसाठी घरमालकाने उपस्थित राहून आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. वसंत निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, नगररचनाकार मा. अ. कुलकर्णी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर उपस्थित होते.येत्या मंगळवारी बैठकगावनिहाय समिती बनवून नियोजन करावे; तसेच ग्रामसभा आणि ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाची पूर्वतयारी करावी. या संदर्भात येत्या मंगळवारी (दि. २७) संबंधित तहसीलदारांनी सर्व यंत्रणांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.कागल ३९- ठाणेवाडी, बोळावी, बोळावीवाडी, हसूर बुद्रुक, तमनाकवाडा, वडगाव, बेलेवाडी का., कासारी, बेलेवाडी मासा, बाळीक्रे, आलाबाद, मुगळी, जैन्याळ, करड्याळ, अर्जुनवाडा, नंद्याळ, अर्जुनी, लिंगनूर, कापशी, गलगले, मेतके, बस्तवडे, सोनगे, कुरुकली, सुरुपली, करंजीवणे, हळदवडे, दौलतवाडी, बेनिक्रे, शिंदेवाडी, भडगाव, कुरणी, चौंडाळ, पिराचीवाडी, सावर्डे खुर्द, केनवडे, पिंपळगाव बु. केंबळी, बामणी, शंकरवाडी.करवीर ५५- आडूर, आरळे, उजळाईवाडी, उपवडे, आरडेवाडी, कळंबे तर्फ कळे, कांचनवाडी, कांडगाव, कावणे, कुर्डू, कुरुकली, पडवळवाडी, कोगील खु., कोगील बु., कोथळी, कंदलगाव, गर्जन, गोकुळ शिरगाव, घानवडे, घुंगूरवाडी, चाफोडी तर्फे आरळे, चिंचवडे तर्फे कळे, चुये, जठारवाडी, जैताळ, तामगाव, तेरसवाडी, दोनवडी तर्फे हवेली, नागाव, निठवडे, विकासवाडी, नंदवाळ, मोरेवाडी, पाटेकरवाडी, पाडळी बु., पासार्डे, शिपेकरवाडी.भाटणवाडी, भामटे, मांजरवाडी, मादळे, मांडरे, म्हारुळ, म्हालसवडे, वडगाव खु., वाडवारी, वाडीपीर, सडोली दुमाला, सरनोबतवाडी, सादळे, सावर्डे इनाम, हलसवडे, हासूर, हिरवडे खालसा, हिरवडे दुमाला. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर