शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळीमध्ये वीज वितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

मुरगूड : सोनाळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. गावातील सर्व्हे करून ...

मुरगूड : सोनाळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. गावातील सर्व्हे करून विद्युत वितरण कंपनीने नागरिकांची गैरसोय दूर करावी या आशयाचे निवेदन सोनाळी ग्रामस्थांनी मुरगूड वीज वितरण कार्यालयाला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कागल तालुक्यातील सोनाळी हे ३५५० लोकवस्तीचे गाव आहे. गावाचा विस्तार होत असून, वस्ती वाढत आहे. शाळेपाठीमागील नाना नगरमध्ये १५ वर्षांपासून वस्ती आहे. मात्र अद्याप तिथे विद्युत खांब टाकलेले नाहीत. तिथे विजेची सोय होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी जुने लोखंडी विद्युतखांब खराब झालेले आहेत. विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत, त्यामुळे त्या कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थी खेळत असतात, तिथेच धोकादायक लोखंडी विद्युतखांब आहेत. मुख्य वस्तीतील लोखंडी विद्युतखांब, समाजमंदिराजवळील मुख्य विद्युत डीपीवरून सतत स्पार्किंग होत असते, ती बदलणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे ओढ्याकडील व शेतजमिनीतील बांधावरील विद्युत खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. भडगाव, निढोरी, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक रस्त्याजवळील लोकवस्तीमध्ये वाढीव खांब टाकावेत, अशी मागणी केली आहे. निवेदन मुरगुडचे उपकार्यकारी अभियंता महेश शेंडे, कर्मचारी प्रवीण पाटील, नम्रता मोरबाळे यांना ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे, संदीप म्हातुगडे, संजय चौगले, शंकर म्हातुगडे, उत्तम पोकलेकर, संदीप कपले, सुरेश कोरे, बसवराज कोरे, मारुती पोवार, नामदेव कोरे, लक्ष्मण भिउंगडे, बाळासो कातोरे, रामचंद्र भिउंगडे, महादेव कोरे उपस्थित होते.