शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

चिमुकल्या जुनैनाच्या जगण्यासाठी दातृत्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:12 IST

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांची मोठी बहीण झाली दाता : थॅलेसेमिया उपचारासाठी १६ लाखांचा खर्च

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : जुनैना अवघ्या सात महिन्यांची असताना जुलाब लागले, कमी होईना म्हणून काही तपासण्या झाल्या आणि थॅलेसेमियाचे निदान झाले. आता ती तीन वर्षांची असून, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट झाले तर पूर्णत: बरी होणार आहे. लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी पाच वर्षांची रिजवानाच दाता झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.

पोस्टल कॉलनी, पाचगाव येथील जावेद नदाफ हे रिक्षाचालक असून, ते विद्यार्थी वाहतूक करतात. पती-पत्नी आणि दोन मुली असे हे कुटुंब. मोठी रिजवाना पाच वर्षांची, तर जुनैना तीन वर्षांची आहे. जुनैनाला थॅलेसेमिया असून या आजारात नवीन रक्त तयार होत नाही, त्यामुळे ते दर महिन्याला चढवावे लागते. तेव्हापासून तिला रक्त चढवण्यासह औषधोपचार सुरू आहे. योग्य काळजी घेतल्याने आता ती आॅपरेशन सहन करू शकेल इतकी सक्षम झाली आहे. हे आॅपरेशन कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातही होत नाही. त्यामुळे सध्या तिच्यावर बंगलोर येथील अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जुनैनाला जगवण्यासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट करावे लागणार आहे.

सर्व तपासणीअंती रिजवानाचे बोन मॅरो जुनैनाला योग्यरितीने मॅच होत असल्याचे सिद्ध झाले. आपल्या लाडक्या लहान बहिणीसाठी ती दाता झाली आहे. या उपचारासाठी तिला ६ महिने दवाखान्यात राहावे लागणार असून, त्यासाठी तब्बल १६ लाख रुपये खर्च येणार आहे. जावेद यांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, ते लेकीला वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांपासून ते विविध ट्रस्टकडे तिची फाईल घेऊन फिरत आहेत. तरीही आठ ते नऊ लाख रुपये कमी पडत आहेत.

 

वडिलांचे आवाहनदानशूरांनी शक्य तितकी मदत करावी, असे आवाहन वडील जावेद नदाफ यांनी केले आहे. तुम्ही शंभर रुपयांपासून देखील मदत करू शकता.

आयडीबीआय खाते :- ६१५१००१०००५३०१आयएफसी कोड : -कइङछ0000६१५गुगल पे, पे टीएमने सुद्धा पैसे पाठवूसंपर्क : ७३८५५४८९६४, ८४२१९२१९६४पत्ता : प्लॉट नंबर ०३, हरी पार्क, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर रोड पाचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिकbankबँक