शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

चिमुकल्या जुनैनाच्या जगण्यासाठी दातृत्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:54 IST

जुनैना अवघ्या सात महिन्यांची असताना जुलाब लागले, कमी होईना म्हणून काही तपासण्या झाल्या आणि थॅलेसेमियाचे निदान झाले. आता ती तीन वर्षांची असून, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट झाले तर पूर्णत: बरी होणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी पाच वर्षांची रिजवानाच दाता झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. वडील जावेद नदाफ हे रिक्षाचालक असून, ते लेकीच्या जिवासाठी धडपडत आहेत; या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांची मोठी बहीण झाली दाता थॅलेसेमिया उपचारासाठी १६ लाखांचा खर्च

इंदुमती गणेशकोल्हापूर : जुनैना अवघ्या सात महिन्यांची असताना जुलाब लागले, कमी होईना म्हणून काही तपासण्या झाल्या आणि थॅलेसेमियाचे निदान झाले. आता ती तीन वर्षांची असून, बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट झाले तर पूर्णत: बरी होणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीला वाचवण्यासाठी पाच वर्षांची रिजवानाच दाता झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे आॅपरेशन होणार असून, त्यासाठी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. वडील जावेद नदाफ हे रिक्षाचालक असून, ते लेकीच्या जिवासाठी धडपडत आहेत; या चिमुकलीला वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या दातृत्वाची गरज आहे.पोस्टल कॉलनी, पाचगाव येथील जावेद नदाफ हे रिक्षाचालक असून, ते विद्यार्थी वाहतूक करतात. पती-पत्नी आणि दोन मुली असे हे कुटुंब. मोठी रिजवाना पाच वर्षांची, तर जुनैना तीन वर्षांची आहे. जुनैनाला थॅलेसेमिया असून या आजारात नवीन रक्त तयार होत नाही, त्यामुळे ते दर महिन्याला चढवावे लागते.

तेव्हापासून तिला रक्त चढवण्यासह औषधोपचार सुरू आहे. योग्य काळजी घेतल्याने आता ती आॅपरेशन सहन करू शकेल इतकी सक्षम झाली आहे. हे आॅपरेशन कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातही होत नाही. त्यामुळे सध्या तिच्यावर बंगलोर येथील अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.जुनैनाला जगवण्यासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट करावे लागणार आहे. सर्व तपासणीअंती रिजवानाचे बोन मॅरो जुनैनाला योग्यरितीने मॅच होत असल्याचे सिद्ध झाले. आपल्या लाडक्या लहान बहिणीसाठी ती दाता झाली आहे. या उपचारासाठी तिला ६ महिने दवाखान्यात राहावे लागणार असून, त्यासाठी तब्बल १६ लाख रुपये खर्च येणार आहे.

जावेद यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, ते लेकीला वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांपासून ते विविध ट्रस्टकडे तिची फाईल घेऊन फिरत आहेत. शासकीय योजनांमधून निधी मिळतो का पाहात आहेत. तरीही आठ ते नऊ लाख रुपये कमी पडत आहेत.

आपल्या लाडक्या लेकीसाठी दानशूर कोल्हापूरकरांनी शक्य तितकी मदत करावी, असे कळकळीचे आवाहन वडील जावेद नदाफ यांनी केले आहे. तुम्ही शंभर रुपयांपासून देखील मदत करू शकता.

  • आयडीबीआय बँक खाते ६१५१००१०००५३०१
  • आयएफसी कोड : -कइङछ0000६१५
  • आपण गुगल पे, पे टीएमने सुद्धा पैसे पाठवू शकता.
  • संपर्क : ७३८५५४८९६४, ८४२१९२१९६४
  • पत्ता : प्लॉट नंबर ०३, हरी पार्क, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर रोड भाग्यश्री किराणा दुकानाजवळ, पाचगाव, कोल्हापूर.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर