लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:06+5:302021-04-05T04:22:06+5:30
नृसिंहवाडी / बुबनाळ : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. याबाबत स्थानिक ...

लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज : दौलत देसाई
नृसिंहवाडी / बुबनाळ : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. याबाबत स्थानिक आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी यांनी जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आलास जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत गावांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या परवीन पटेल होत्या. स्वागत ग्रामपंचायत सदस्य अमोल पुजारी यांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी पी. एस. पाखरे, धनाजीराव जगदाळे, मल्लाप्पा चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, डॉ. पी. एस. दातार, गटविकास अधिकारी शंकर कवितके, पं. स. सदस्या रूपाली मगदूम, सरपंच पार्वती कुंभार, रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी बी. एन. टोणे, महादेव पुजारी, डॉ. मुकुंद पुजारी, डॉ. किरण अणुजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अब्दुललाट येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. सदस्य विजय भोजे, मल्लू खोत, सरपंच पांडुरंग मोरे, डॉ. यमाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, तर घालवाड येथे झालेल्या बैठकीस पं. स. सभापती कविता चौगुले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.