शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज : अभिजित कापसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:03 AM

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये आपले नागरिकत्व काढून घेतले जाणार की काय, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अभिजित कापसे यांनी येथे केले.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज : अभिजित कापसेमहावीर महाविद्यालयात व्याख्यान

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये आपले नागरिकत्व काढून घेतले जाणार की काय, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अभिजित कापसे यांनी येथे केले.येथील महावीर महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, तर महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, संस्थेचे कार्यवाह महावीर देसाई प्रमुख उपस्थित होते. व्याख्यानाचा विषय ‘भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ असा होता.

अ‍ॅड. कापसे म्हणाले, धार्मिक अत्याचाराला कंटाळूनच पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून हिंदू, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन समाजाचे अल्पसंख्याक लोक भारतात आले. त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सन १९५५ मध्ये नागरिकत्व कायदा अंमलात आला. आतापर्यंत पाच वेळा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.

दि. १० जानेवारी २०२० पासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला. सध्या भारतात असणाऱ्या अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे; पण कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही.

या व्याख्यानास राष्ट्रीय छात्रसेनेचे लेफ्टनंट उमेश वांगदरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शैलजा मंडले, प्रा. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. लेफ्टनंट डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले.समाजमनाने ठरवायचे असतेमहापौर लाटकर म्हणाल्या, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात रोज सोशल मीडियावर माहिती येत असते. अनेकदा आपण ही माहिती न वाचता पुढे पाठवितो. त्यामुळे वाद निर्माण होतात. कायदा ‘तारक की मारक’ हे समाजमनाने ठरवायचे असते.

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर