शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

यंत्रमागाचे आधुनिकीकरण गरजेचे, इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा मेळावा : नरेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:51 IST

साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

इचलकरंजी : साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहिजे. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी दिली.

येथील घोरपडे नाट्यगृहात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने आयोजित यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात तेबोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेशकुमार म्हणाले, बदलत्या काळानुसार व्यवसायात आवश्यक बदल करून घेणे हे बाजारात टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी त्याचे आधुनिक रॅपियर यंत्रमागातरूपांतर करावे. त्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ३५ टक्के व स्वभांडवल १५ टक्के अशीयोजना आहे. त्याचबरोबर सूताच्या कृत्रिम दरवाढीला पर्याय म्हणून किमान ११ यंत्रमागधारकांनी एकत्रित येऊन यार्न बॅँक सुरू करावी. त्यांच्याकडून जेवढे भांडवल एकत्रित होईल, तेवढेच भांडवल केंद्र सरकार देणार आहे. याचा सूत खरेदीसाठी उपयोग करावा. कारखानदारांनी एकत्रित येऊन ग्रुपशेड पद्धतीने व्यवसाय करावा. त्यासाठीही योजना आहेत.

वीज बचत करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन कारखान्यावर सोलर पॅनेल बसवावे. कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेचाही लाभ घ्यावा. अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

आमदार हाळवणकर यांनी, उद्योगधंद्यात राजकारण आणणाऱ्यांच्या नादाला यंत्रमागधारकांनी लागू नये. आपल्या धंद्यावर लक्ष केंद्रित करावे. सरकारने पाच टक्के व्याजात सवलत जाहीर केली आहे. आगामी अधिवेशनात वीज दराबाबतही सवलत जाहीर करेल. यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण केल्यास उत्पादन वाढणार आहे. तसेच आवाज कमी, दुरुस्ती खर्च कमी, गती जास्त त्यामुळे उत्पादन वाढून उत्पन्न व पर्यायाने नफा वाढणार आहे. त्यासाठी ६५ पार्ट बदलून साध्या यंत्रमागाचे आधुनिक मागात रूपांतर होते, ते करण्याचा संकल्प यंत्रमागधारकांनी करावा. त्यातून नक्कीच व्यवसायाला गती मिळेल, असे आवाहन केले.

मेळाव्यात नरेंद्र वन्नम, पी. ए. कुलकर्णी, सुरेश इंगळे, किसन पवार, अशोक स्वामी, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, आदींसह प्रमुख पदाधिकारी, तसेच यंत्रमागधारक उपस्थित होते.पथदर्शी प्रकल्पकेंद्र व राज्य शासनामार्फत साध्या यंत्रमागाचे आधुनिक यंत्रमागात रूपांतर करण्यासाठी सुरू केलेली ही योजना इचलकरंजी, सोलापूर, भिवंडी, नागपूर या चार शहरांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासनाने सुरू केली आहे.

इचलकरंजीत यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, सुरेश हाळवणकर, अलका स्वामी, अशोक स्वामी, नरेंद्र वन्नम, आदी उपस्थित होते.