शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजनेची मुदत वाढविण्याची गरज--एका रेशनकार्डामुळे...

By admin | Updated: July 30, 2014 00:30 IST

जाणकारांतून प्रतिक्रिया : प्रशांतच्या मदतीसाठी आवाहन; विमा कंपनी, संबंधित रुग्णालयांची जबाबदारी टाळण्याचीच भूमिका

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेत इटीए (इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन) देऊन शस्त्रक्रिया केली जाते. त्याची कागदपत्रे जमा करण्याची मुदत ७२ तास आहे; परंतु शनिवार-रविवारला जोडून सुटी येते तेव्हा एवढ्या वेळेत ही कागदपत्रे जमा करणे रुग्णाला शक्य होत नसल्याने त्याची मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.मुदतीत रेशनकार्ड जमा न करता आल्याने आंबार्डे (ता. शाहूवाडी) येथील प्रशांत पांडुरंग सोनार याच्यावर या योजनेतून उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी पै-पै गोळा करून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली; परंतु शासनाची योजना असूनही पुन्हा शस्त्रक्रियेसाठी पैसे खर्च करावे लागले. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले. आजच सकाळी प्रशांतला घरी जाऊ देण्यात आले. या बातमीची दखल म्हणून रुग्णालयाने त्याच्यावरील उपचाराचे दहा हजार रुपये माफ केले. अजूनही त्याच्यावरील नियमित उपचारासाठी पैशाची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी त्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेत सुरू असलेल्या सावळा गोंधळाबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विमा कंपनी व संबंधित रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा ती टाळण्यातच जास्त धन्यता मानतात, असा अनुभव आल्याचे अनेकांनी सांगितले. प्रशांत सोनार याचे वडील येथील मार्केट कमिटीमध्ये हमाल आहेत. एक पोते उतरले किंवा चढवले की त्यांना सहा रुपये हमाली मिळते. त्यांची मुलांवर उपचार करण्याची ऐपत नाही. त्यामुळे प्रशांतवरील शस्त्रक्रियेसाठी बजरंग सपकाळ, गजानन पाटील, प्रा. प्रकाश पाटील, शिवपार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक व्हनागडे व इतर शिक्षक स्टाफ, विद्यार्थी यांनी मोलाची मदत केली. मूळचे आंबार्डेचे व आता ‘गोकुळ’मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले तानाजी कडवेकर यांनी तर स्वत:चा मुलगा रुग्णालयात असल्याप्रमाणे हा मुलगा बरा व्हावा यासाठी प्रयत्न केले. मुंबईकर ग्रामस्थांनीही खूप मदत केलीच शिवाय आणखी मदत करण्याची तयारी दर्शविली.अ‍ॅपल सरस्वती रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापक गीता आवटे यांनी प्रशांतवर माणुसकीचा विचार करूनच रुग्णालयाने उपचार केल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘टेलिफोनिक मंजुरी घेऊन शस्त्रक्रिया केली आणि मुदतीत कागदपत्रे जमा झाली नाही, तर नंतर झालेल्या खर्चाबाबत वितंडवाद होतात. त्यामुळे शक्यतो कागदपत्रांसाठी आग्रह धरतो. या योजनेतील सर्वाधिक शस्त्रक्रिया याच रुग्णालयात झाल्या आहेत.’ (प्रतिनिधी)पांडुरंग सोनार यांचे दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड आहे; परंतु ते सुस्थितीत नव्हते. त्यामुळे मुलाच्या उपचाराचा आर्थिक भार व त्यासोबतचा सगळा मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. आपल्या वाट्याला कधी दुर्घटना येईल, याचा नेम नसतो. याकरिता लोकांनी रेशनकार्ड काढून ठेवण्याची गरज आहे. छोटेसे दुर्लक्ष किती महागात पडते, याचाच अनुभव या घटनेतून आला आहे.‘लोकमत’ने आज पुन्हा आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यासंबंधी काय करता येते याबाबत जरूर विचार करू, असे त्यांनी सांगितले.प्रशांतचे वडील हमाल असल्याने माथाडी बोर्डाकडून त्यांना काही मदत मिळू शकते का, याचीही चौकशी केली. सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याकडे त्यासंबंधी विचारणा केल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पालकांना गुरुवारी कागदपत्रांसह त्यांनी भेटण्यासाठी बोलाविले आहे. माथाडी बोर्डाकडून प्रत्येकी लाखाचा विमा उतरलेला असतो. त्यातूनही मदत करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रशांतचे वडील हमाल असल्याने माथाडी बोर्डाकडून त्यांना काही मदत मिळू शकते का, याचीही चौकशी केली. सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याकडे त्यासंबंधी विचारणा केल्यावर त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पालकांना गुरुवारी कागदपत्रांसह त्यांनी भेटण्यासाठी बोलाविले आहे. माथाडी बोर्डाकडून प्रत्येकी लाखाचा विमा उतरलेला असतो. त्यातूनही मदत करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.