शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 10:28 IST

punepadwidhar, elecation, ncp, bjp, kolhapur, pune गेल्या २४ वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तो भेदण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी केली आहे. सध्या चित्र पाहता या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच लढत होणार असल्याचे दिसते. या दोन्ही पक्षांकडून लढण्यासाठी सध्या डझनभर उमेदवार इच्छुक आहेत.

ठळक मुद्देभाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी पुणे पदवीधर मतदारसंघातील चित्र : दोन्ही पक्षांतून डझनभर इच्छुक

संतोष मिठारी

कोल्हापूर : गेल्या २४ वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तो भेदण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी केली आहे. सध्या चित्र पाहता या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच लढत होणार असल्याचे दिसते. या दोन्ही पक्षांकडून लढण्यासाठी सध्या डझनभर उमेदवार इच्छुक आहेत.या मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांनी जोरदार लढत दिली. राष्ट्रवादीमधील दुसरे इच्छुक अरुण लाड हे अपक्ष लढले. बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसल्याने चंद्रकांत पाटील विजयी झाले. निवडून आल्यानंतर तीन-चार महिन्यांत त्यांच्याकडे भाजपने राज्यातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली.

पुढे प्रदेशाध्यक्षपदीही दिले. हा कार्यभार सांभाळताना त्यांचे पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार आहे. आमदार पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातून लढणार नसल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निसटत्या पराभवाचे विजयात रूपांतर करण्याच्या उद्देशाने सारंग पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून तयारी केली. पदवीधर नोंदणीमध्ये आघाडी घेतली. मात्र, त्यांनी गेल्या दीड महिन्यापूर्वी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

गेल्यावेळी लढलेले दोन्ही उमेदवार रिंगणात नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादीतून यंदा निवडणूक लढविण्यासाठी एकूण १२ उमेदवार इच्छुक आहेत. पक्षांकडून आपल्यालाच संधी मिळावी यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अरुण लाड यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.

भाजपची हॅटट्रिक साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप आपला बालेकिल्ला कायम राखण्यात यशस्वी ठरणार की, राष्ट्रवादी मुसंडी मारणार याबाबतचे अधिक चित्र या दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर स्पष्ट होईल. इच्छुकांनी आपापल्या पातळीवर गेल्या प्रचार सुरू केला आहे. विविध पद्धतींनी ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.इच्छुक उमेदवार१) भाजप : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कोल्हापुरातून दोन वेळा ह्यपदवीधरह्णची निवडणूक लढविणारे माणिक पाटील-चुयेकर, माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, विधिमंडळ लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसन्नजित फडणवीस.२) राष्ट्रवादी : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, पुणे येथील नंदादीप प्रतिष्ठानच्या नीता ढमाले, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस उमेश पाटील, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने.३) इतर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रवीण कोडोलीकर, संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड.जिल्हानिहाय मतदार

  • कोल्हापूर : ८४१४८
  • सांगली : ७९४९६
  • सातारा : ५४९०७
  • सोलापूर : ३८७१२
  • पुणे : ७८८५१
टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर