राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची घेतली पवारांनी दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 15:16 IST2019-04-12T15:14:54+5:302019-04-12T15:16:12+5:30
: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या प्रचारात नसलेल्या नगरसेवकांची दखल घेतली असून त्यांना नोटीस काढण्याच्या सुचना शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची घेतली पवारांनी दखल
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या प्रचारात नसलेल्या नगरसेवकांची दखल घेतली असून त्यांना नोटीस काढण्याच्या सुचना शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना केल्या आहेत. जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी पवार यांची भेट घेतली.
याचवेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, कणकवलीचे उपनगराध्यक्ष अबीद नाईक, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली. हॉटेलवरून बाहेर पडण्याआधी पवार यांनी आर. के.पोवार यांना शहरातील नगरसेवकांबाबत विचारणा केली. तेव्हा काही नगरसेवक प्रचारात नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा जयंत पाटील यांना सांगून त्यांना नोटीस देण्याच्या सुचना पवार यांनी केल्याचे समजते.