शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळलेलेच; तडजोडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:57 IST

ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेची पहिली मूळ बैठक ज्या जिल्ह्यात झाली तोच कोल्हापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु आज या बालेकिल्ल्याचे बुरुज पुरते ढासळले आहे. पक्ष बळकटीसाठी नेतृत्वाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

विश्वास पाटील

कोल्हापूर : ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेची पहिली मूळ बैठक ज्या जिल्ह्यात झाली तोच कोल्हापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु आज या बालेकिल्ल्याचे बुरुज पुरते ढासळले आहे. पक्ष बळकटीसाठी नेतृत्वाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मागच्या दहा वर्षात पक्ष खुरटल्यासारखा झाला आहे. संस्थात्मक सत्ता हाती असली तरी विधानसभा व लोकसभेतील पक्षीय बळ घटले आहे ते वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोणती कडू-गोड गोळी देणार हेच महत्त्वाचे आहे. तडजोडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी देताना पक्ष नामोहरम झाला आहे.

या पक्षाची परिवार संवाद विचार यात्रा आज, बुधवारी कोल्हापुरात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा ताकदीचा लेखाजोखा घेतल्यास त्यातील भुसभुशीतपणा उघड होतो. विधानसभेच्या दहापैकी सध्या कागल व चंदगडला पक्षाचे आमदार आहेत. राधानगरी मतदार संघात पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, शाहूवाडी, शिरोळ मतदार संघात पक्षाची फारशी ताकद नाही. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतल्यापासून तिथे पक्ष अस्तित्वासाठीच झगडत आहे. इचलकरंजीत ताकद असली तरी तिथे गटबाजी आवरताना पुरेवाट अशी स्थिती आहे. तिथे मदन कारंडे आणि नितीन जांभळे यांच्यात राजकीय वैरवाद आहे. हातकणंगले मतदार संघात अलिकडे राजीव आवळे यांनी पक्षाचा झेंडा हातात घेतल्यावर किमान कांही ताकद निर्माण झाली आहे; परंतु तिथेही मूळचा राष्ट्रवादी व नंतर पक्षात आलेले यांच्यात मनोमिलन नाही.

बारापैकी करवीरमध्ये मधुकर जांभळे, राधानगरीत ए.वाय.पाटील, कागलला स्वत: ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, भुदरगडमध्ये माजी आमदार के.पी.पाटील, गडहिंग्लजमध्ये माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, चंदगडला आमदार राजेश पाटील, आजरामध्ये मुकुंद देसाई-वसंतराव धुरे,पन्हाळा बाबासाहेब पाटील, शाहूवाडीमध्ये मानसिंगराव गायकवाड, शिरोळमध्ये अमरसिंह माने हे पक्षाचे शिलेदार आहेत; परंतु यातील चार-पाच नेते सोडले तर अन्य कार्यकर्त्यांनी तालुक्यात पक्ष फक्त जिवंत ठेवला आहे. त्यांचा तालुक्याच्या राजकारणांवर प्रभाव नाही.

नेमके कुणाला मोठे करायचे होते?

जिल्हा बँकेच्या राजकारणात आमदार विनय कोरे की बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, असा जेव्हा पेच तयार झाला तेव्हा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब पाटील यांच्या मागे ताकद उभी करायला हवी होती; परंतु त्यांना जिल्हा बँकेच्या एकूण राजकारणात कोरे यांची मदत होते म्हणून आसुर्लेकर यांचा बळी दिला. त्यातून त्यांनी वेगळे पॅनेल केले व महाविकास आघाडीतच दुफळी झाल्याचे चित्र पुढे आले. ज्या कोरे यांच्यासाठी त्यांनी हे सगळे केले ते जिल्ह्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत. मग मुश्रीफ यांना कुणाला मोठे करायचे होते, हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

अस्वस्थता कशातून..

राज्यात पक्षाची सत्ता येवून अडीच वर्षे होत आली तरी कोणत्याही शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना स्थान मिळालेले नाही. साधे विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा फुकटचा गोल शिक्काही पक्षाने कुणाला दिलेला नाही. जे सत्तेत आहेत, तेच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पदाचा स्वत:साठी व आपल्याच सग्यासोयऱ्यांसाठी वापर करून घेत आहेत. त्यातून सामान्य कार्यकर्त्याला कशी ताकद मिळणार, याचा विचार होत नाही.

तालुक्यापुरता विचार..

या पक्षातील सर्वच नेत्यांना घाणेरडी खोड आहे. प्रत्येक नेता आपापल्या तालुक्यात कशी सत्तेची पोळी पडेल, यासाठी ताकद पणाला लावतो. आपला तालुका झाला, आपली माणसे आत गेली की पुरे. इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना कुणी वालीच नाही, असा अनुभव येतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तेच्या काळात पक्षासाठी झगडणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना खूप बळ दिले. त्यातून त्यांच्या आयुष्याची घडी बसवून दिली; परंतु या पक्षाने सत्ता आल्यावर किती सामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले, याचा शोध घेण्याची गरज आहे.

लोकसभेत अस्तित्वच पुसले

पक्षाच्या स्थापनेपासून लोकसभेच्या दोन निवडणुकीत दोन्हीच्या दोन्ही जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २००९ ला दोन्ही जागांवर पराभव झाल्यानंतर पक्षाचे वैभव लयाला गेले. देशात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही कोल्हापूरची जागा पक्षाने जिंकली होती; परंतु गेल्या निवडणुकीत पुन्हा पाटी कोरी झाली आहे. आता महाविकास आघाडी म्हणून लढायचे ठरल्यास दोन्ही जागा शिवसेनेला जातील व लढतो म्हटले तरी पक्षाकडे आज ताकदीचा उमेदवार नाही, हीच स्थिती विधानसभेचीही आहे. दहापैकी सात ठिकाणी पक्षाची हीच अवस्था आहे.

राष्ट्रवादीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यावेळची पक्षीय स्थिती

  • आमदार : ०५
  • खासदार : ०२
  • सहकारी संस्था : जिल्हा बँक, बाजार समिती
  • स्थानिक स्वराज्य संस्था: जिल्हा परिषद 

राष्ट्रवादी आजची ताकद..

  • आमदार : ०२
  • खासदार : ००
  • सहकारी संस्था : जिल्हा बँक, बाजार समिती, गोकूळ दूध संघ
  • स्थानिक स्वराज्य संस्था : कोल्हापूर महापालिकेत व जिल्हा परिषदेत अर्धी सत्ता.
  • विधान परिषदेत स्थान नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ