- जहांगीर शेखकागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्याच्यां कागल गडहिग्लज विधानसभा मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले आहेत. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचां जाहीर निषेध करीत आहेत. मंत्री मुश्रीफ हे या मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. ठिकठिकाणी सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती भर चौकात जाळण्यात आली आहे. विविध पदाधिकारी यांनीही निषेधाची पत्रके प्रसिद्धीस दिली आहेत. पोलीसांनी संवेदनशील गावात पोलिसांना पाठवले आहे.मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परीषद घेऊन अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचे जाहीर केल्यानंतर वातावरण थोडे शांत झाले आहे. कागल मुरगुड या शहरात गटागटाने निषेध व्यक्त केला. तर शिवसेना कार्यकर्त्यांनीही किरीट सोमय्याचा निषेध केला आहे.
कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी काढली किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:13 IST