माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:13 IST2019-05-27T14:11:16+5:302019-05-27T14:13:19+5:30

उसने दिलेले २५ हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आदित्य शरदचंद्र मरळकर (वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे.

NCP party workers with crime against former corporator's brother | माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

ठळक मुद्देमाजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हादोघांकडून तरुणाला मारहाण

कोल्हापूर : उसने दिलेले २५ हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आदित्य शरदचंद्र मरळकर (वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे.

मरळकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावाने सायबर चौक परिसरात राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती. त्याला पैशांची गरज असल्याने २५ हजार रुपये एका वर्षापूर्वी दिले होते.

सहा महिन्यांनंतर दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलो असता दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये कसबा बावडा परिसरातील एका कॉलेजजवळ बोलावले. त्या ठिकाणी पैसे देण्याऐवजी दोघांनीही बेदम मारहाण केली.

माजी नगरसेवकाचा भावाने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. दुसरा संशयित राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी हा जमीन-खरेदीचे व्यवहार करतो. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करत आहेत.
 

 

Web Title: NCP party workers with crime against former corporator's brother