हसनभाईंच्या निधनामुळे राष्ट्रवादीने हाडाचा कार्यकर्ता गमावला : राजेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:52 IST2021-06-11T18:49:35+5:302021-06-11T18:52:20+5:30
NCP Kolhapur : हसनभाईंच्या निधनाने आपण एक हाडाचा कार्यकर्ता गमावलो आहे.त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी पक्ष आणि समाजात निर्माण झालेला पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे, अशी भावना आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.

हलकर्णी ( ता.गडहिंग्लज ) येथे आमदार राजेश पाटील यांनी दिवंगत हसन बाणदार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी अभय देसाई,अबुबक्कर बाणदार, इक्बाल बाणदार,चंद्रकांत जांगनुरे उपस्थित होते.
हलकर्णी: हसनभाईंच्या निधनाने आपण एक हाडाचा कार्यकर्ता गमावलो आहे.त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी पक्ष आणि समाजात निर्माण झालेला पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे, अशी भावना आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.
हलकर्णी ( ता.गडहिंग्लज) येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते हसन बाणदार यांचे नुकतेच निधन झाले.त्यामुळे आमदार पाटील यांनी बाणदार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला.यावेळी बाणदार कुटुंबियांकडून कोरोना लढ्यातील योध्दयांना 'मास्क'चे वाटप करण्यात आले.
आमदार पाटील म्हणाले, हसनभाईंच्या विचारांचा वारसा कुटुंबीयांनी व कार्यकर्त्यांनी यापुढेही चालू ठेवावा.राष्ट्रवादी पक्ष भविष्यातही बाणदार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
यावेळी सरपंच योगिता संगाज,जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी,अबुबक्कर बाणदार, इक्बाल बाणदार,जुबेदा बाणदार, नसीमा बाणदार,विजय शेरवी,भाऊ काळोजी, चंद्रकांत जांगनुरे, सुन्नत मुस्लिम जमातचे अलीसाहेब कादरभाई,उमरअली बागवान,बाबासाहेब तब्बलजी उपस्थित होते.अयाज बागवान यांनी आभार मानले.