राष्ट्रवादी पदवीधरची निवडणूक ताकदीने लढविणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:39 IST2020-11-10T15:38:50+5:302020-11-10T15:39:56+5:30
padwidhar, elecation, politicis, ncp, hasanmusrif, kolhapurnews पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार आर. के. पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात ३ लाख ६४ हजार ४४९ मतदार आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ८७ हजार ९५८ मतदारांची नोंदणी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारास सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पदवीधर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करावे. पदवीधर संघाचे अध्यक्ष अनिल घाटगे यांनी स्वागत केले. ॲड. प्रियांका संकपाळ यांनी आभार मानले. यावेळी सुधीर बिरांजे, महेश गायकवाड, शर्मिला सामंत, ॲड. अभिजित हिरूगडे, प्रा. राजेंद्र पाटील, राहुल चव्हाण, अमर निंबाळकर, धनंजय चव्हाण आदी उपस्थित होते.